कोकण

मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनची सभा

CD

rat२p४१.jpg-
26O61388
रत्नागिरी : युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्या सभेत बोलताना महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे संघटन सचिव विनोद कदम. सोबत किरण खोपडे, मनोज लिंगायत व रोहित सुर्वे आदी.
---
बँक कर्मचाऱ्यांचा संघर्षाचा निर्धार
‘युनायटेड फोरम’ची सभा; प्रलंबित मागण्यांवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : पाच दिवसांचे बँकिंग लागू करणे, पीएलआयसंदर्भातील एकतर्फी व भेदभावपूर्ण धोरण मागे घेणे तसेच बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. रत्नागिरी शहरातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे अधिकारी, कर्मचारी एकत्र आले.
बैठकीदरम्यान त्यांनी सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरणांविरोधात युनियनच्या नेतृत्वाखाली एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार केला. येत्या ११ सप्टेंबर रोजी, २८ ते ३० सप्टेंबरला तीन दिवस व त्यानंतर २६ ऑक्टोबर बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर युनियनच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन अधिक व्यापक व प्रभावी करण्याच्या उद्देशाने ही संयुक्त बैठक झाली. बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिसशेजारी युनियन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. हा लढा कोणत्याही एका बँकेचा नसून संपूर्ण बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सामूहिक लढा आहे. त्यामुळे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बॅनरखाली सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहन शाखा भेटीदरम्यान करण्यात आले.
---
सर्व बॅंका एकाच व्यासपीठावर
रत्नागिरी शहराच्या इतिहासात प्रथमच सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचारी व अधिकारी प्रतिनिधींना एका व्यासपीठावर आणून युनियनची अशी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली, ही बाब संघटनात्मक एकजुटीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे उपस्थित प्रतिनिधींनी नमूद केले. ‘एक बँक नव्हे, सर्व बँका–एकच संघर्ष, एकच लढा’ या घोषणेने आगामी आंदोलन अधिक व्यापक व प्रभावी करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपुरात डीजे ‘सायलेंट’! ३ नोव्हेंबरपर्यंतचे आदेश; दहीहांडी, पोळा, गणेशोत्सव, नवरात्र आणि धम्मचक्रप्रवर्तन दिनीही राहणार बंद

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या 15 मागण्या काय? सरकारची भूमिका काय? | Maratha Reservation

Malad Accident: मालाड अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल, भरधाव कारचं नियंत्रण सुटलं, लोकांना चिरडत पुढे गेली

Marathi News Live Updates : विद्यानंद बापट यांना मारहाण केलेल्या आरोपीला उद्या कोर्टात हजार करणार - पुणे पोलीस आयुक्त

Pune Traffic Update : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल; ४-५ सप्टेंबरला ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्गांची यादी पाहा

SCROLL FOR NEXT