- rat३p५.jpg-
26O61435
राजापूर ः खड्ड्यांमुळे अशी दुरवस्था झालेले रस्ते.
----
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आव्हान
राजापुरात ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था; ६० लाख निधीची गरज
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यांप्रमाणेच गावोगावी जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. दीड-दोन फूट रुंदीच्या मोठमोठ्या खड्ड्यांतून धक्के खात वाहने चालवावी लागत असल्याने प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत, तर वाहनांचे सुटे भाग निखळण्याची वेळ आली आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असताना त्यापूर्वी या रस्त्यांची डागडुजी न झाल्यास लाडक्या गणरायाचे आगमन खड्ड्यांतील प्रवास करतच करावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
राजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अखत्यारित सुमारे ४७१ किलोमीटर लांबीचे ४१८ रस्ते येतात. यापैकी शंभरहून अधिक रस्त्यांवरून गावोगावी जाणारी एसटी महामंडळाची ‘लालपरी’ धावते; मात्र, सध्या या रस्त्यांवर ‘डांबर कमी अन् खड्डेच जास्त’ अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असून, वाहनधारकांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. या रस्त्यांवरील खड्डे बुजवून केवळ डागडुजी करण्यासाठी बांधकाम विभागाला ५० ते ६० लाख रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता आहे. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना, चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून रस्त्यांची डागडुजी करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांसह वाहनधारकांमधून केली जात आहे.
---
दृष्टिक्षेपात राजापूर
* एकूण रस्ते - ४१८
* एसटी वाहतूक असलेले रस्ते -१००
* रस्त्यांची लांबी - ४७१ कि.मी.
* खड्डे बुजवण्यासाठी अपेक्षित निधी सुमारे ६० लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.