कोकण

रत्नागिरीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

CD

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उद्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : टिळक आळी गणेशोत्सव मंडळ, श्री मारुती पिंपळपार देवस्थान यांच्यातर्फे गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन येत्या रविवारी (ता. ६) टिळक आळीतील वैद्य मंगल कार्यालयात केले आहे.
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व चेसडोटस ॲकॅडमी, रत्नागिरी यांच्या सहकार्याने गणेशोत्सवाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी रोख रक्कम व चषक अशा स्वरूपात एकूण २० हजार रुपयांची रोख बक्षिसे असून, खुल्या गटासह ८, १०, १२ व १४ वर्षाखालील गट अशा विविध वयोगटांतील मुलांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. वय १५–३५, ३६-५५ व ५५ वर्षावरील गट व सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. गतवर्षी मंडळाकडून शताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेला सुरुवात झाली होती. त्या स्पर्धेत एकूण १०५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यातील २० खेळाडू हे फिडे मानांकित खेळाडू होते. स्पर्धेत नावनोंदणीसाठी उपेंद्र खेर यांच्याशी संपर्क साधावा व सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंडळाचे विश्वस्त शशिकांत काळे, मंदार खेर, प्रभाकर करमरकर, अरुण करमरकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Industrial Estate : सैनिक टाकळीत 'गायरान' जमिनीची प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी; प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला विरोध कायम, उदय सामंतांनी काय दिलं आश्वासन?

धनंजय-पार्वती चढले बोहल्यावर! ‘अशी ही बनवाबनवी’चा AI VIDEO पाहून हसू अवरेना, तुम्ही पाहिलात का?

Crime: अग्रिपाड्यात दुहेरी हत्याकांड! १९ वर्षीय पत्नीची गळा चिरून हत्या, नंतर स्वतःलाही संपवलं; धक्कादायक कारण समोर

Marathi News Live Updates : धुळ्यात एसटी बसचा भीषण अपघात, ट्रकची जोरदार धडक, ४५ विद्यार्थी जखमी, ६ जणांची प्रकृती गंभीर

Nagpur Hotel Universe Case: हॉटेल युनिव्हर्समध्ये देहव्यवसाय, मालकाला अटक

SCROLL FOR NEXT