अतिक्रमण हटाव मोहिमेचे स्वागत
रत्नागिरीच्या सौंदर्यात भर ; पुनर्वसनासाठी पुढाकार घ्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः शहरातील प्रत्येक रस्त्यावर आणि चौकाचौकांत झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे शहरवासियांकडून स्वागत होत आहे. पक्षभेद विसरून शहराच्या व जनतेच्या हिताचा विचार करत सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेबद्दल रत्नागिरीकरांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
या ऐतिहासिक शहराला आकर्षक आणि टापटीप बनवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी कोट्यवधींचा निधी मंजूर केला असून, अनेक विकासकामेही केली आहेत; मात्र, वाढत्या अतिक्रमणांमुळे शहराला विद्रुपता आली होती. यापूर्वी खाऊगल्लीतील विक्रेत्यांचे मंत्र्यांच्या पुढाकाराने पुनर्वसन करण्यात आले होते; परंतु, त्यानंतर प्रशासनाकडून होणारी कारवाई जुजबी ठरत होती. आता प्रशासनाने धडक कारवाई करत रस्ते आणि चौक मोकळे केले असून, शहराने जणू नव्याने मोकळा श्वास घेतला आहे.
कारवाईमुळे विस्थापित झालेल्या हातावर पोट असलेल्या टपरी आणि हातगाडीधारकांचा उदरनिर्वाह लक्षात घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगर परिषद प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी नगर परिषदेच्या मालकीच्या उपलब्ध जागांवर या सर्व व्यावसायिकांची एकत्रित बैठक घ्यावी. नाममात्र भाडेतत्त्वावर खाऊगल्लीच्या धर्तीवर त्यांचे समन्वयाने योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.
---
कोट
‘अतिक्रमण हटाव मोहीम’ कोणत्याही राजकीय वा सामाजिक दबावाला बळी न पडता अविरतपणे चालू ठेवावी.
- समीर इंदुलकर, नाचणे, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.