rat४p२.jpg-
26O61641
रत्नागिरी- ममता गावडे, गीताली शिवलकर, शर्वरी करगुटकर, प्रज्ञा काळे, योगेश मोरबाळे, मोहन बापट, प्रा. बाबासाहेब सुतार.
‘लायन्स’चे शिक्षक पुरस्कार जाहीर
कार्याचा गौरव ; रत्नागिरीत उद्या होणार वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये गीताली शिवलकर, मोहन बापट, योगेश मोरबाळे, प्रज्ञा काळे, ममता गावडे, प्रा. बाबासाहेब सुतार आणि शर्वरी करगुटकर यांचा समावेश आहे.
लायन्स क्लबतर्फे गेल्या २५ वर्षांपासून शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीचा सोहळा येत्या रविवारी (ता. ६) रोजी लायन्स आय हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य, साहित्यिक, नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, रीजन चेअरमन डॉ. नीलेश पाटील, झोन अध्यक्ष शिल्पा पानवलकर, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष सुमित ओसवाल, सचिव ललित शहा व खजिनदार प्रदीप हरचिकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कै. ल. ग. पटवर्धन स्मरणार्थ, लायन एच. एल. पटवर्धन पुरस्कृत पुरस्कार शिक्षिका गीताली शिवलकर (परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर), मोहन बापट (फाटक हायस्कूल) आणि योगेश मोरबाळे (गांगण–केळकर कनिष्ठ महाविद्यालय) यांना देण्यात येणार आहे. राजश्री गडकरी स्मृतिप्रीत्यर्थ, शिल्पा पानवलकर पुरस्कृत पुरस्कार प्रज्ञा काळे (मुख्याध्यापिका, आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालमंदिर) यांना प्रदान करण्यात येईल. कै. अविनाश मोरे स्मृतिप्रीत्यर्थ, साक्षी धुरी पुरस्कृत पुरस्कार ममता गावडे (अंगणवाडी सेविका, शिरगाव) व पै. हुसैनखान फडनाईक स्मृतिप्रीत्यर्थ, ॲड. शबाना वस्ता पुरस्कृत विशेष पुरस्कार प्रा. बाबासाहेब सुतार (प्राध्यापक, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय) आणि अलका देव स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. शिवानी पानवलकर पुरस्कृत पुरस्कार शर्वरी करगुटकर (जिल्हा परिषद शाळा, मेर्वी) यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे.
---