कोकण

मोबाईल, व्यसन, आळसापासून दूर रहा

CD

rat४p३.jpg-
26O61642
रत्नागिरी : नंदाई प्रतिष्ठान आयोजित विद्यार्थी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवर.
---
व्यसन अन् वाईट संगतीपासून दूर राहा
अभय तेली ः ‘नंदाई प्रतिष्ठान’तर्फे गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : विद्यार्थ्यांनी व्यसन, मोबाईल, वाईट संगत, ‘मीपणा’ व आळस या पाच गोष्टींपासून दूर राहिल्यास यशाचा मार्ग निश्चितपणे मिळतो, असे मार्गदर्शन रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अभय तेली यांनी केले. हातखंबा येथील नंदाई प्रतिष्ठान आयोजित गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
या वेळी चांदेराई प्राथमिक आरोग्यकेंद्राचे डॉ. शामसुंदर मोरे, गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाचे डॉ. आनंद आंबेकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विद्याधर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागात २५ वर्षे रुग्णांची अतिशय उत्तम सेवा करणारे सेवाभावी डॉ. मोरे यांना संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पोलिस खात्यात काम करताना गाव तेथे वाचनालय हा समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल उपनिरीक्षक तेली यांचाही विशेष सत्कार केला. गोगटे महाविद्यालयात परफॉर्मिंग आर्ट्स हे नावीन्यपूर्ण शिक्षण सुरू करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल डॉ. आंबेकर यांना गौरवण्यात आले. दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट शैक्षणिक सेवा व सेवानिवृत्तीबद्दल सुहास आयरे, प्रदीप जाधव, सुनील भोसले, दीपक मोहिते यांना गौरवण्यात आले. महाराष्ट्र रत्नपुरस्कार प्रकाश सावंत, कोकणरत्न पुरस्कार चंद्रकांत पवार आणि डॉ. प्रणाली दहीहंडे, तरवळ येथील सर्वेश मायंगडे, सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत दहावी आलेल्या खुशी कांबळे यांना सन्मानित केले.
---
दोन विद्यार्थी दत्तक
संस्थेच्यावतीने दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले. वेळवंड गावामध्ये वाचनालय सुरू करण्यासाठी प्रातिनिधिक १० पुस्तकांचा सेट देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात डीजेबंदी होणार? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? विद्यानंद बापटांच्या मराठीचं केलं कौतुक

Alcohol Seized : गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा शिरूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केला जप्त; दोन वाहने ताब्यात

Stray Dog Attack : उंब्रज येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार! ८० वर्षीय आजी गंभीर जखमी; चार गायी अन् पाळीव प्राण्यांवर हल्ला

Marathi News Live Updates : पुण्यात डीजेविरोधात आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात आंदोलनाची हाक

Maratha Reservation : २२ गावांतील मराठा बांधवांचा महामार्गावर रास्ता रोको

SCROLL FOR NEXT