- rat४p७.jpg-
6O61646
चिपळूण ः डॉ. डोके यांचा सत्कार करताना विभागप्रमुख डॉ. कुलकर्णी व डॉ. घारे.
---
‘घरडा’मधील प्राध्यापकांचे दुहेरी यश
डॉ. डोके, प्रा. मापारा यांची राष्ट्रीय स्तरावर भरारी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागाने संशोधन क्षेत्रात भरारी घेतली आहे. साहाय्यक प्राध्यापक डॉ. सुहास डोके यांच्या ‘सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन विथ मेकॅनिकल स्टिरिंग’ या डिझाईन पेटंटला भारत सरकारकडून मान्यता मिळाली आहे. तसेच प्राध्यापक जयेश मापारा यांनी ‘राष्ट्रीय तांत्रिक शिक्षक प्रशिक्षण व संशोधन संस्थे’तर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.
दुहेरी यशाबद्दल रासायनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. कुलकर्णी यांनी दोन्ही प्राध्यापकांचे अभिनंदन केले. ‘या यशामुळे आपल्या विभागातील संशोधन संस्कृती अधिक समृद्ध होत असून, विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि उच्चदर्जाच्या शिक्षणासाठी मोठी प्रेरणा मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, ‘घरडा इन्स्टिट्यूट नेहमीच प्राध्यापकांच्या संशोधन, पेटंट नोंदणी, नवोपक्रम, उद्योगाभिमुख उपक्रम आणि कौशल्यवृद्धीसाठी अग्रक्रमाने पाठबळ देते. प्राध्यापकांच्या ज्ञानवृद्धीसोबतच त्यांचे तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावे यासाठी संस्था आवश्यक त्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.