कोकण

मंडणगड - अतिवृष्टीचा मंडणगडला फटका; 64 मालमत्तांचे नुकसान

CD

यंदाच्या पावसात
६४ मालमत्तांचे नुकसान
मंडणगड तालुका; घरांसह दुकानांची हानी, २२ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ : यंदा तालुक्यात अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी घरांसह दुकानांचे नुकसान झाले. आतापर्यंत ६४ मालमत्तांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. प्राथमिक पंचनाम्यानुसार, या नुकसानाची अंदाजित रक्कम २२ लाख ४२ हजार ७८२ रुपये आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या नोंदीनुसार, अतिवृष्टीमुळे ५८ घरांचे नुकसान झाले असून, त्याची अंदाजित नुकसान भरपाई १८ लाख ६ हजार १२ रुपये आहे. तसेच पाच पक्क्या घरांचे नुकसान झाले असून, त्यातून सुमारे ३ लाख २ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. याशिवाय एका दुकानाचे नुकसान झाले असून, त्याचे अंदाजित नुकसान १ लाख ३४ हजार १७० रुपये इतकी आहे.
दरम्यान, पावसामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या नुकसानीची माहिती प्रशासनाकडून संकलित करण्यात येत आहे. संबंधित नुकसानग्रस्त प्रकरणांचे पंचनामे करून पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचे तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.

चौकट
नुकसानाचा तपशील :
* घरे : ५८ - १८,०६,०१२ रुपये
* पक्की घरे : ५ - ३,०२,६०० रुपये
* दुकान : १ - १,३४,१७० रुपये
* एकूण मालमत्ता : ६४
* एकूण नुकसान : २२,४२,७८२ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

India vs Japan: टीम इंडिया 'सुझुकी कप'साठी जपानच्या दौऱ्यावर; कधी खेळला जाणार ऐतिहासिक सामना? BCCI कडून घोषणा

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT