कोकण

जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 24.77 टक्केने कमी पाऊस

CD

26O61949
एआय चित्र

जिल्ह्यात २४.७७ टक्के कमी पाऊस
गतवर्षीच्या तुलनेत केवळ ७४.५१ टक्केच नोंद; भविष्यात पाणी टंचाईची भीती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : जिल्ह्यात यंदा मॉन्सून हंगामात पावसाचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीयरित्या घटले आहे. प्रशासकीय आकडेवारीवरून हे समोर आले आहे. ५ सप्टेंबरपर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्यात यंदा एकूण २५०६.५६ मि.मी. (७४.५१ टक्के) पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कालावधीत तब्बल ३३३९.९८ मि.मी. (९९.२८ टक्के) पाऊस पडला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सुमारे ८३३.४२ मि.मी. म्हणजेच २४.७७ टक्के कमी पाऊस झाला आहे.
पावसाने यंदा चांगलीच ओढ खाल्ली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसात मोठी घट झाली आहे. ​मंडणगड तालुक्यात यंदा २६९२.५० मि.मी. (६९.१० टक्के) पाऊस झाला असून, गतवर्षी या कालावधीत ३२८६.५७ मि.मी. (८४.३४ टक्के) पाऊस झाला होता.​ दापोलीत २५८.४९ मि.मी.ची घट झाली असून, यंदा २७६०.६३ मि.मी. म्हणजे (७६.९९ टक्के) नोंद झाली आहे. गतवर्षीच्या ३३५५.६२ मि.मी. (९३.५८ टक्के) नोंद होती. ​खेड तालुक्यात यंदा ३१५७.९० मि.मी. (८९.९५ टक्के) पाऊस झाला आहे, तर गतवर्षी येथे ३८६१.१८ मि.मी. (१०९.९८ टक्के) पाऊस पडला होता. ​गुहागरमध्ये यंदा २१७४.८२ मि.मी. (८४.१० टक्के) पाऊस झाला असून, गतवर्षी तो २५८७.४३ मि.मी. (१००.०६ टक्के) होता. चिपळूण तालुक्यात ३०४८.१९ मि.मी. (८५.९३ टक्के) पाऊस झाला आहे; गतवर्षी येथे ३७६१.६३ मि.मी. (१०६.०४ टक्के) नोंद झाली होती. संगमेश्वर तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला असून, यंदा २२७३.९७ मि.मी. (६४.०८ टक्के) पाऊस नोंदवला होता तर गतवर्षी तब्बल ३४८६.६९ मि.मी. (९८.२५ टक्के) पाऊस झाला होता. ​रत्नागिरी तालुक्यात यंदा १८९०.१५ मि.मी. (६८.७१ टक्के) पाऊस झाला आहे. गतवर्षी याच वेळी २६८९.७३ मि.मी. (९७.७७ टक्के) पाऊस झाला होता. ​लांजा तालुक्यात २३४८.५० मि.मी. (६६.३६ टक्के) पाऊस नोंदवला गेला आहे जो गतवर्षीच्या ३५२४.५६ मि.मी. (९९.५९ टक्के) पेक्षा खूपच कमी आहे. ​राजापूर तालुक्यात यंदा २२१२.३७ मि.मी. (६६.७८ टक्के) पाऊस झाला असून, गतवर्षी येथे ३५०६.३९ मि.मी. (१०५.८४ टक्के) पाऊस पडला होता. एकूणच, यंदा खेड आणि चिपळूण तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याचे दिसत आहे. संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यांत पाऊस ६४ ते ६७ टक्क्यांवरच रोखला गेला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे हे संकेत असल्याचे चित्र आहे.
---
जिल्ह्यातील आजचा पाऊस
आज जिल्ह्यात सरासरी ९.०१ मि.मी. दैनंदिन पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस दापोली (१२.२८ मि.मी.), लांजा (१२.२० मि.मी.) आणि गुहागर (१२.०० मि.मी.) तालुक्यात झाला. गतवर्षी आजच्याच दिवशी जिल्ह्यात १५.८२ मि.मी. सरासरी पाऊस झाला होता. ​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi कमी होता, त्यात आणखी एकाची भर पडली! २० वर्षीय टीममेटचा कहर, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

Pune indigenous defence tech: पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञांचा स्वदेशी स्टार्टअप; मानवरहित ड्रोन, स्वायत्त बोटींद्वारे जलसुरक्षेत क्रांती

Blood Pressure: हाय बीपीवर फक्त मीठ कमी करण्याचा उपाय पुरेसा नाही; पोटॅशियम वाढवणेही गरजेचे! संशोधनातून नवा खुलासा...

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Marathi News Live Updates: राज्यातील भरती परीक्षेसाठी राज्य शासनाकडून ७ अधिकाऱ्यांची सुधारणा समिती गठीत

SCROLL FOR NEXT