कोकण

लवेल - लोटे येथे डायलिसिस केअर युनिट

CD

ratchl52.jpg ः
61933
चिपळूण ः लवेल येथील घरडा रुग्णालयात उभारण्यात आलेले डायलिसिस युनिटच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर.
----------------

लोटे डायलिसिस युनिटमुळे
गरजू रुग्णांना दिलासा
चिपळूण, ता. ५ ः जिल्ह्यातील डायलिसिसची आवश्यकता असलेल्या रुग्णांना स्थानिक पातळीवर आरोग्यसुविधा मिळावी यासाठी घरडा केमिकल्स, कृष्णा अँटिऑक्सिडंट आणि रोटरी क्लब चिपळूण यांच्यावतीने लवेल-लोटे येथील घरडा हॉस्पिटल येथे डायलिसिस केअर युनिट सुरू करण्यात आले. या युनिटचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली यांच्या हस्ते झाले.
या वेळी तेली यांनी रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून, गरजू नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे, ही सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. घरडाचे विनायक दळवी यांनी सामाजिक गरजा ओळखून रोटरीच्या उपक्रमांना भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कृष्णा अँटिऑक्सिडंटचे सुयोग चव्हाण यांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीची माहिती दिली.
रोटरी क्लबचे अध्यक्ष शैलेश टाकळे यांनी घरडा आणि कृष्णा कंपनीच्या सहकार्याबद्दल आभार मानले. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या तसेच नियमित डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांसाठी हे युनिट मोठा आधार ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली. प्रकल्पात चेअरमन प्रसाद सागवेकर व मंगेश माटे यांनी विशेष जबाबदारी पार पाडली. या वेळी बापूराव पवार, विकास जाधव, अभय शेरीकर, डॉ. फिरोज पटेल, रचना तिवारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

SCROLL FOR NEXT