-rat५p२१.jpg-
26O61938
रत्नागिरी : अ. के. देसाई हायस्कूलच्या मुलींच्या हॉकी संघाची विभागासाठी निवड झाली. या संघासमवेत मार्गदर्शक.
--------
देसाई हायस्कूलची विजयी भरारी
नेहरू हॉकी चषक स्पर्धा ; विभागस्तरीय निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय नेहरू हॉकी चषक स्पर्धा साडवली-देवरूख येथील कै. मिनाताई ठाकरे विद्यालयाच्या मैदानावर झाली. यात मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या मुलींच्या १७ वर्षाखालील संघाने विजय संपादन करून विभागस्तरीय स्पर्धेत प्रवेश केला.
या संघाने उत्तम सांघिक खेळ करत न्यू इंग्लिश हायस्कूल, देवरुखच्या मुलींच्या संघाचा सात गोलने दणदणीत पराभव केला. यात महेक मुल्ला हिने तीन गोल, मुस्कान व जीविका यांनी प्रत्येकी एक गोल आणि आसमाने दोन गोल मारून विजयश्री खेचून आणली. महेक मुल्ला हिने विजयी संघाचे नेतृत्व केले. लावण्या साळुंखे, पूर्वा कांबळे, मैथीली कांबळे, दिव्या पवार, आयशा टुमके, मुस्कान मुल्ला, तन्वी तुपारे, राफिया भाटकर, संगीता पाल, पौर्णिमा सनगरे, जीविका घडशी, तन्वी ताम्हणकर, अंकिता पवार, सिद्धी कांबळे, आसमा साखरकर यांनी उत्तम खेळ केला.
या संघाला हॉकी प्रशिक्षक सुशांत पवार, अजय कांबळे, सचिन पाटील, सचिन मटकर, जीवन जाधव, अतुल पाटील, विश्रांती चवेकर, संतोष गार्डी यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.