कोकण

‘अगरबत्ती’तून दिव्यांगांच्या स्वावलंबनाला नवी दिशा

CD

- ratchl५४.jpg-
26O62197
चिपळूण ः अगरबत्ती तयार करताना जिद्द चे विद्यार्थी.
---
दिव्यांगांच्या ‘जिद्दी’ला नवा सुगंध

‘अगरबत्ती’मधून स्वावलंबनाला बळ

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः दिव्यांग युवक-युवतींच्या कौशल्यांना रोजगाराभिमुख दिशा देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षम’ प्रकल्पांतर्गत ‘जिद्द अगरबत्ती’ या ब्रँडचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. रोटरी क्लबचे अध्यक्ष शैलेश टाकळे यांच्या हस्ते या ब्रँडचा उद्‍घाटन झाले. ‘जयदीप मोने उद्योग केंद्रा’च्या माध्यमातून तयार होणाऱ्या या अगरबत्ती निर्मितीत दिव्यांग प्रशिक्षणार्थींना थेट सहभागी करून घेण्यात आले आहे.
‘डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रा. लिमिटे’च्या सीएसआर (सीएसआर) उपक्रमांतर्गत ''सह्याद्री निसर्ग मित्र'' या संस्थेतर्फे हा ‘सक्षम’ प्रकल्प राबवला जात आहे. जिद्द शाळेतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि व्यावसायिक विकासासाठी या माध्यमातून विविध उपक्रम चालवले जातात. व्यावसायिक प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना विविध वस्तू तयार करण्याचे कौशल्य दिले जात असून, जयदीप मोने उद्योग केंद्रात अगरबत्तीसह इतर उत्पादनेही तयार केली जात आहेत. ‘जिद्द अगरबत्ती’मध्ये सध्या सुगंधी गुलाब, म्हैसूर चंदन, सुवर्ण चंपा, केवडा, मोगरा आणि फ्रुट ब्लास्ट हे सुवासिक प्रकार उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र, या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ अगरबत्ती विक्री नसून, दिव्यांग व्यक्तींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, जबाबदारी आणि स्वाभिमान मिळवून देणे हा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Elections: पश्चिम बंगालच्या धर्तीवर भाजपची पंजाबमध्ये रणनीती! 'आप'ला हद्दपार करण्यासाठी 'हा' मुद्दा केंद्रस्थानी

कोण आहेत IAS नेहा? ५० दिवसांत बदली, वर्षभरात ४ वेळा ट्रान्सफर होताच संतापल्या

महिन्याभरापूर्वी घेतली महागडी गाडी; एका महिन्याला किती कमावते तेजश्री प्रधान? किती आहे एकूण संपत्ती?

Vastu Tips: घरात हंस किंवा बदकाची जोडी ठेवावी की नाही? वास्तूशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे आणि नियम

Marathi News Live Updates: गणवेश जबाबदारीची जाणीव करुन देतो- पोलिस महासंचालक सदानंद दाते

SCROLL FOR NEXT