rat6p17.jpg-
62167
श्रीउतरेश्वराचे मंदिर
----------
‘उत्तरेश्वर’ मंदिरामुळे दहागावचा धार्मिक नकाशावर ठसा
श्रावणात भाविकांची गर्दी ; काळानुरूप मंदिरात सुधारणा
मंडणगड, ता. ६ : तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहागाव गावाला समृद्ध ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिक वारसा लाभला आहे. गावाच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र असलेले स्वयंभू ‘श्री उतरेश्वर मंदिर’ संपूर्ण तालुक्यात आस्थेचे स्थान बनले असून, सध्या श्रावण महिन्यात शिवभक्तांची मोठी गर्दी होत आहे.
उतरेश्वराच्या प्रकटस्थळाबाबत गावात एक प्राचीन आख्यायिका प्रचलित आहे. पूर्वी दहागावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली गाय दूध देण्याच्या वेळी दूध देत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे ब्राह्मणाने गाईवर पाळत ठेवली असता, गाय सध्याच्या मंदिर परिसरात जाऊन एका ठराविक ठिकाणी स्वतःहून दुधाचा अभिषेक करत असल्याचे त्याला दिसले. ब्राह्मणाने ती जागा साफ केली असता तेथे उत्तर दिशेला तोंड असलेले स्वयंभू शिवलिंग आढळले. उत्तर दिशेला तोंड असल्यामुळे या शिवलिंगाला ‘उतरेश्वर’ हे नाव पडल्याचे सांगितले जाते.
त्या-त्या काळातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या मंदिराची उभारणी केली. काळानुरूप मंदिरात विविध सुधारणा करण्यात आल्या असून, भविष्यात येथे अधिक भव्य मंदिर उभारण्याचे नियोजन ग्रामस्थांनी केले आहे. सध्या श्रावण सोमवारनिमित्त उतरेश्वर मंदिरात भाविकांकडून विशेष पूजा-अर्चा आणि महाभिषेक केले जात आहेत. परिसरातील शिवभक्तांच्या उपस्थितीने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.
चौकट 1
त्रिपुरी पौर्णिमा व महाशिवरात्रीला उत्सव
मंदिरात त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला तीन दिवसांचा मोठा उत्सव असतो. या काळात भजन, पूजन, गुणदर्शन आणि विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे, उतरेश्वराच्या सेवेसाठी गेल्या पन्नास वर्षांपासून अखंडपणे नाटक सादर करण्याची परंपरा ग्रामस्थांनी जपली आहे. सर्व जाती-धर्मांतील ग्रामस्थ या उत्सवात एकत्र येत असल्याने हा उत्सव सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.