कोकण

कुवेच्या विकासासाठी निधी देऊ ः सामंत

CD

कुवेच्या विकासासाठी निधी देऊ ः सामंत
लांजा ः नागरिकांना लहान-सहान कामांसाठी हेलपाटे मारावे लागू नयेत, हेच आमचे ध्येय आहे. कुवेवासीयांचे कोणतेही काम थांबणार नाही. गावाच्या टप्प्याटप्प्याने विकासासाठी आमदार म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्याची माझी जबाबदारी आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले. लांजा तालुक्यातील कुवे येथील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. नागरिकांना विविध शासकीय कामे व दाखल्यांसाठी लांजा येथे जावे लागू नये, प्रशासकीय सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने नगरपंचायत कार्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, गटारे आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधांना गती देण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाचे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर आदी उपस्थित होते.
------------
लोकनृत्य स्पर्धेत मांडकी-पालवण द्वितीय
चिपळूण ः आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव मयूरपंखमध्ये मांडकी-पावलण येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य व ललित कला विभागात द्वितीय क्रमांक मिळवला. दापोली येथे हा महोत्सव झाला. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या संघाने ‘भारतीय लोकनृत्य’ प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. याशिवाय ललित कला प्रकारातही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य दाखवत ऑन द स्पॉट पेंटिंग, पियुष सलोखे (प्रथम), कोलॅज मेकिंग श्रावणी कदम (द्वितीय), क्ले मॉडेलिंग जतीन पाटणकर (तृतीय), भारतीय लोकनृत्य प्रकारात श्रावणी भिसे, श्रावणी कदम, प्राजक्ता कुंभार, स्वरांजली रामशे, सरिता गिरी, सावली लाड, श्रद्धा लांबे, समीक्षा पाटील आणि श्रावणी सपकाळ या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला.
--------
rat6p7.jpg-
62128
रत्नागिरी ः जनता सहकारी बँकेच्या राम आळी शाखेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना शुभेच्छा देताना बँकेचे कर्मचारी.
--------------
जनता बँकेतर्फे शिक्षक दिनी
रत्नागिरीतील शिक्षण संस्थांना भेटी
पावस ः जनता सहकारी बँकेच्या राम आळी शाखेने शहरातील चार नामांकित शिक्षण संस्थांमध्ये जाऊन शिक्षक दिन साजरा केला.
त्यात फाटक प्रशाला, पटवर्धन प्रशाला, गोदूताई जांभेकर प्रशाला आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांचा समावेश आहे. सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून कृतज्ञता व्यक्त करावी, या उद्देशाने राम आळीतील जनता बँकेच्या शाखेने हा उपक्रम राबविला. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी बँकेकडून सतत विविध उपक्रम राबवले जातात. यावेळी बँकेचे अधिकारी गिरीश काळे म्हणाले, आमचे ब्रीदवाक्य ‘सहकार्यम यशोधनम’ आहे. केवळ बँकिंग व्यवसाय न करता समाजाचे देणे लागतो या भावनेतून आम्ही काम करतो. ठिणगी निर्माण करणे हे शिक्षकाचे काम आहे, त्या ठिणगीचे विराट ज्वालेत रूपांतर करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : माजी मंत्री मोहसिन रजा यांची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT