कोकण

कॉंक्रीटकरणाचा खर्च पालिका का करते

CD

कॉंक्रिट रस्त्याच्या निविदेनंतरही खर्च
प्रसाद सावंत ः पालिकेचे खड्ड्यांवर पांघरूण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. लोकप्रतिनिधी सुस्त असून रत्नागिरी नगर पालिका खड्ड्यांवर पांघरूण घालण्यात व्यस्त आहे. या रस्त्याच्या कॉंक्रिटकरणाची निविदा निघालेली असताना पालिका लाखो रुपयांचा खर्च का करत आहे, असा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, एसटी बसस्थानक ते मारुती मंदिर, माळनाका व इतर परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. गणपती उत्सव तोंडावर आला असताना देखील प्रशासनाला जाग आलेली नाही. भाविकांना, गणेश मंडळांना या खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. याबाबत श्री. सावंत म्हणाले, नगर पालिका सध्या महागडी, खर्चिक यंत्रणा वापरून खड्डे बुजवत आहे. एक मोठा खड्डा बुजवायला हजारो रुपये खर्च होत आहे. हा खर्च पालिका का करतेय, हा प्रश्न आहे. या रस्त्याचे कॉंक्रिटकरणाची निविदा निघालेली असताना हा लाखो रुपयांचा खर्च का केला जात आहे. तो ठेकेदाराकडून वसूल केला जाणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा एकप्रकारे जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
लोकप्रतिनिधींनी केवळ नारळ फोडण्यापुरते काम करू नये, सुस्थितीतील गटारांवर पेवर ब्लॉक, दुभाजक आणि त्यामधील झाडे ही अनावश्यक कामे करुन जनतेच्या पैशाची राखरांगोळी केली जात आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करून, झालेल्या खर्चाची वसुली ठेकेदाराकडून करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. १०० किलोमीटर कॉंक्रिट रस्त्याच्या कामाचे पुढे काय झाले, याची माहितीही पालिकेने जाहीर करावी जेणेकरून जनतेलाही वास्तव समजेल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Elections: पश्चिम बंगालच्या धर्तीवर भाजपची पंजाबमध्ये रणनीती! 'आप'ला हद्दपार करण्यासाठी 'हा' मुद्दा केंद्रस्थानी

कोण आहेत IAS नेहा? ५० दिवसांत बदली, वर्षभरात ४ वेळा ट्रान्सफर होताच संतापल्या

महिन्याभरापूर्वी घेतली महागडी गाडी; एका महिन्याला किती कमावते तेजश्री प्रधान? किती आहे एकूण संपत्ती?

Vastu Tips: घरात हंस किंवा बदकाची जोडी ठेवावी की नाही? वास्तूशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे आणि नियम

Marathi News Live Updates: गणवेश जबाबदारीची जाणीव करुन देतो- पोलिस महासंचालक सदानंद दाते

SCROLL FOR NEXT