-rat६p२९.jpg-
P26O62218
रत्नागिरी ः अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याबद्दल नगराध्यक्षांना रत्नागिरीतील नागरिकांनी निवेदन देऊन कौतुक केले.
------
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
नागरिकांचे निवेदन; अतिक्रमण हटवल्याबद्दल समाधान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः शहरातील रस्ते, चौक आणि फूटपाथवरील अतिक्रमांवर कारवाई करण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयाचे शहरातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. यासंदर्भात नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांना निवेदन देण्यात आले असून, ही मोहीम अविरतपणे सुरू ठेवावी, तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे सामान्य नागरिकांना व पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नगराध्यक्ष आणि नगरपरिषदेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत अतिक्रमण हटवण्याचा जो एकमुखी निर्णय घेतला आहे, त्यामुळे रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मोहीम अशीच सुरू राहिल्यास शहर लवकरच शंभर टक्के अतिक्रमणमुक्त होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. अतिक्रमण मोहिमेसोबतच शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना समीर इंदुलकर, प्रमोद मोरेश्वर गानू, मोहन मालुसरे, दिलीप घाणे, नंदकिशोर रा. सावंत, मोहन बा. देसाई आणि दीपक गोविंदराव देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.