कोकण

लांजा ः लांजात साकारणार 1 कोटीचे ‘नमो उद्यान’

CD

rat७p७.jpg-
६२३०९
लांजा ः ‘नमो उद्यान’च्या भूमीपूजनाप्रसंगी आमदार किरण सामंत, नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत कुंभार सोबत पदाधिकारी.

लांज्यात साकारणार
१ कोटीचे ‘नमो उद्यान’
शहराच्या सौंदर्यात पडणार भर; लहान मुले, महिला व ज्येष्ठांना विरंगुळा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ७ ः लांजा शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचे भूमीपूजन नुकतेच आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पार पडले. सुमारे १ कोटी रुपये खर्च करून हे सुसज्ज उद्यान उभारण्यात येणार आहे. याचा लाभ नागरिकांना होणार आहे.
लांजा शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन विरंगुळा, आरोग्य व आनंदी वातावरणासाठी हे उद्यान साकारले जात आहे. या प्रकल्पाच्या भूमीपूजनावेळी नगराध्यक्षा सावली कुरूप, राजू कुरूप, रवींद्र नागरेकर, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई, मुन्ना खामकर, जयवंत शेट्ये, सर्व नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते. या उद्यानात लहान मुलांसाठी विविध खेळणी, नागरिकांसाठी प्रशस्त वॉकिंग ट्रॅक, ज्येष्ठांसाठी बैठकीची व्यवस्था तसेच नयनरम्य हिरवळ व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यामुळे सकाळ-संध्याकाळ निवांत वेळ घालवण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी लांजावासियांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. १ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे लांजा शहराचा नवा चेहरा समोर येणार आहे. भूमीपूजनामुळे शहरवासियांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हे उद्यान लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोट
लांजा शहराचा सर्वांगीण विकास हेच आपले प्राधान्य आहे. लांजावासियांना अभिमान वाटेल, असे आधुनिक सुविधांनी सुसज्ज ''नमो उद्यान'' उभारले जाईल. मतदार संघातील पायाभूत व सार्वजनिक सुविधांसाठी शासनाकडून भरीव निधी आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
- किरण सामंत, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

SCROLL FOR NEXT