कोकण

अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे अणुस्कूरातील प्रवास झाला अवघड

CD

rat७p१२.jpg ः
६२३२२
अणुस्कुराः घाटातील रस्त्यावरील खड्डे डांबराने भरण्यात येत आहेत.
rat७p१४.jpg ः
६२३२४
घाटमार्गात अवजड वाहने बंद पडल्याने वाहतूकीस अडथळा होतो.
rat७p१३.jpg ः
६२३२३
अणुस्कुरा घाटमार्गाची पाहणी करताना प्रांताधिकारी विश्‍वजित गाताडे, तहसीलदार विकास गंबरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद कांबळे आणि पोलिस प्रशासन.

अणुस्कुरा घाटमार्गातील प्रवास धोकादायक
गणेशोत्सवात गैरसोय शक्य; अवजड वाहतूक बंदची मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबाघाटातील अवजड वाहतूक बंद असल्यामुळे सर्व भार अणुस्कुरा घाटावर आहे; मात्र, नागमोड्या वळणांचा आणि खड्डेमय रस्ता असलेल्या अणुस्कुरा घाटात अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने येथील प्रवास अत्यंत धोकादायक आणि खडतर बनलेला आहे. गणेशोत्सवात या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होणार असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या घाटातील अवजड वाहतकू बंद ठेवावी लागणार आहे. याबाबत वाहनचालकांकडून मागणीही केली जात आहे.
कोल्हापूरहून रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गोव्याकडे जाण्यासाठी आंबाघाट आणि अणुस्कुरा घाट हे दोन प्रमुख मार्ग आहेत; परंतु, काही दिवसांपूर्वी आंबाघाटातील रस्ता खचल्याने व ठिकठिकाणी भेगा पडल्याने तेथून होणारी अवजड वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद आहे. परिणामी, पश्चिम महाराष्ट्रातून ये-जा करणाऱ्या सर्वच अवजड वाहनांचा भार अणुस्कुरा घाट रस्त्यावर आहे. या मार्गावर आधीच प्रचंड खड्डे असल्यामुळे गैरसोय होत आहे. मागील महिन्यात सोळाचाकी अवजड ट्रक घाटात बंद पडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.
गणेशोत्सव काळात अशी घटना घडली तर मोठा गोंधळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घाटातील बिकट स्थिती आणि गणेशोत्सवातील संभाव्य वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी प्रशासनाला उपाययोजनांसाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार राजापूरचे प्रांताधिकारी विश्वजित गाताडे, तहसीलदार विकास गंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद कांबळे आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे नुकतीच पाहणी केली. त्यात वाहतुकीविषयक चर्चाही झाली; परंतु अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सवात अवजड वाहतुकीवर बंधने घातली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, आंबाघाटातील गायमुखाजवळील भूस्खलन झालेल्या परिसरातील दुरूस्ती वेगाने सुरू आहे; परंतु घाटात पडणाऱ्या पावसामुळे त्यात अडथळा निर्माण होत आहे. हा घाट दुरूस्त झाला तर अणुस्कुरा मार्गावरील वाहतूक कमी राहील.

चौकट १
दिवसाला ८०० ट्रकची वाहतूक
अणुस्कुरा घाटातून दरदिवशी ३५० ते ४००हून अधिक वाहनांची ये-जा सुरू असते. आंबाघाट बंद केल्यानंतर कोल्हापूर-अणुस्कुरा-राजापूर या मार्गावर मालवाहतूक सुरू आहे. ट्रकसह एसटी बसेस मिळून दररोज सुमारे ८०० गाड्या प्रवास करत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवात येथील वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढेल.

चौकट २
चाकरमान्यांची अणुस्कुराला पसंती
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे. काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची शक्यता पाहता चाकरमानी कोकणात येण्यासाठी पुणे-कोल्हापूर-अणुस्कुरा-राजापूर असा प्रवास पसंत करण्याची शक्यता आहे.

कोट
अणुस्कुरा घाटमार्गाची नुकतीच पाहणी केली आहे. पुढील सूचनांची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. सध्या घाटातील रस्त्यावरील खड्डे डांबराच्या साह्याने बुजवण्याचे काम हाती घेतलेले आहे.
- स्वप्नील बावधनकर, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

'समोर निवेदिता सराफ अन् अशोकमामांसोबत रोमँटिक सीन'; मेघा घाडगेने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली...

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांसाठी कसा असेल पुढचा काळ? शनीच्या साडेसातीपासून कधी मिळणार दिलासा?

Onion Price Hike: कांद्याने ओलांडली 'पन्नाशी'! घाऊक भाव ५३, किरकोळ ७० रुपयांवर

SCROLL FOR NEXT