कोकण

माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी जंगलात खाद्यवृक्षांची लागवड गरजेची

CD

जंगलातील अन्नसाखळी मजबूत करा
नित्यानंद भागवत ः माकडांना नैसर्गिक अधिवासात पाठवण्यावर भर द्या
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः उपद्रवी माकडे पकडून त्यांना जंगलात सोडण्याची योजना शासनाने आणली आहे; मात्र हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी माकडांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांच्या पारंपरिक खाद्याची उपलब्धता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी वनक्षेत्रात स्थानिक व अन्न देणाऱ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याची गरज असल्याचे मत नित्यानंद भागवत यांनी व्यक्त केले आहे.
वाघ आणि बिबट्याप्रमाणेच ग्रामीण व शहरी भागात सध्या मानव-माकड संघर्ष वाढत आहे. शेतीचे होणारे नुकसान, घरांमध्ये घुसखोरी आणि मानवी वस्त्यांमधील वाढता वावर यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून शासनाने उपद्रवी माकडे पकडून जंगलात सोडण्यासाठी प्रतिमाकड ६०० रुपये मानधनाची तरतूद केली आहे.
या मोहिमेत सुरक्षित जाळी, पिंजऱ्यांचा वापर, १० किमी दूर जंगलात सोडणे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग अशा अटी समाविष्ट आहेत; मात्र, केवळ माकडे पकडून दूर सोडल्याने हा प्रश्न सुटणार नाही, असे सांगत भागवत यांनी स्पष्ट केले की, जंगलातील बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्यजीवांची अन्नसाखळी विस्कळीत झाली आहे. अन्नाच्या शोधातच ही माकडे मानवीवस्त्यांकडे वळत आहेत. त्यामुळे शासकीय वृक्षलागवड कार्यक्रमात स्थानिक वन्यजीवांना खाद्य व आश्रय देणाऱ्या पारंपरिक वृक्षप्रजातींच्या लागवडीला प्राधान्य देण्याची अट शासनाने घालावी, अशी मागणी त्यांनी केली.

चौकट
लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
बेसुमार वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त करतानाच या गंभीर प्रश्नाकडे आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम यांनी गांभीर्याने लक्ष देऊन हा मुद्दा योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत. शासनाने वृक्षलागवड धोरणात माकडांचे पारंपरिक खाद्य असणाऱ्या वृक्षांचा समावेश करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भागवत यांनी केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : माजी मंत्री मोहसिन रजा यांची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT