कोकण

इंग्रजी संदेशांसाठी संदर्भजाणिवेची नवी प्रणाली

CD

काही सुखद - लोगो
62642
rat8p7.jpg-
62542
मंजूषा सूर्यवंशी

इंग्रजी संदेशांसाठी संदर्भजाणिवेची नवी प्रणाली
प्रा. मंजुषा सूर्यवंशी यांना युटिलिटी पेटंट; संदर्भ व लहेजा ओळखून संदेश तयार करण्याची सुविधा
राजापूर, ता. ८ ः इंग्रजीचे ज्ञान असूनही ई-मेल किंवा संदेश लिहिताना योग्य शब्दरचना, व्याकरण आणि लहेजा याबाबत अनेकांना अडचणी येतात. ही अडचण दूर करण्यासाठी रयत शिक्षणसंस्थेच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका प्रा. मंजुषा सूर्यवंशी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित ‘तत्काळ संदर्भ जागरूक संगणकीय प्रणाली’ विकसित केली आहे. त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाकडून युटिलिटी पेटंट जाहीर झाले आहे.
सध्या उपलब्ध असलेली अनेक एआय साधने प्रामुख्याने इंग्रजीतील व्याकरणाच्या चुका दुरूस्त करतात; मात्र, संदेशाचा संदर्भ आणि त्यानुसार आवश्यक असलेला लहेजा (टोन) ओळखण्यात त्यांना मर्यादा येतात. ही उणीव लक्षात घेऊन सूर्यवंशी यांनी आपल्या भाषिक ज्ञानाचा उपयोग करून संदर्भानुरूप, व्यावसायिक आणि व्याकरणदृष्ट्या अचूक इंग्रजी संदेश तयार करणारी प्रणाली विकसित केली.
या संशोधनासाठी त्यांना महाविद्यालयातील सहकारी डॉ. कुलभूषण ससाणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या संशोधनाची दखल घेत बौद्धिक संपदा विभागाने पेटंट नोंदणी करून त्याचे अधिकृत प्रकाशन केले आहे. प्रा. सूर्यवंशी यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षणसंस्थेच्या दक्षिण विभागीय चेअरमन संगीताताई पाटील, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विक्रांत पाटील, समितीचे सदस्य, प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

चौकट
अशी आहे संगणकीय प्रणाली
तुम्ही कोणाला मेसेज-ईमेल पाठवत आहात, विषय किती महत्वाचा किंवा तातडीचा आहे आणि किती औपचारिक भाषा हवी आहे आदी संदर्भाची अचूक ओळख ही प्रणाली आपोआप समजून घेते. त्याचवेळी, मूळ अर्थ सुरक्षित ठेवताना इंग्रजी सुधारताना मूळ संदेशाचा अर्थ, कामाशी संबंधित तांत्रिक शब्द, तारखा आणि आकडेवारी अजिबात बदलत नाही. माहिती सुरक्षित ठेवून अत्यंत कमी वेळात योग्य भाषेची रचना केली जाते. त्यानंतर, त्या मेसेजमध्ये कोणत्याही चुका राहू नयेत म्हणून तयार झालेला संदेश पाठवण्यापूर्वी तो पूर्णपणे तपासून घेतला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT