भटक्या कुत्र्यांना आळा घाला
प्रसाद सावंत ः अन्यथा पालिकेवर गुन्हा दाखल करा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. फगरवठार पोलिसलाईनजवळ एका छोट्या मुलावर कुत्र्यांच्या कळपाने जीवघेणा हल्ला केला. शहरातील भटक्या कुत्र्यांना वेळीच आवर घाला अन्यथा पालिकेवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी केली आहे.
शहरातील मारुती मंदिर, एसटी बसस्थानक परिसर, माळनाका, शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांवर हल्ले होत आहेत. गेल्या काही दिवसात अनेकजण जखमी झाले आहेत. नगरपालिकेने नागरिकांच्या मूलभूत सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे. पोलिसलाईनजवळ खेळणाऱ्या छोट्या मुलांवर सात ते आठ कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. तेथील काही जागरूक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली म्हणून त्या बालकांचा जीव वाचला. या प्रकाराची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, ‘भटक्या कुत्र्यांचे तत्काळ निर्बीजीकरण करून बंदोबस्त करावा. निर्बीजीकरण किती वर्षापूर्वी झाले होते ते जाहीर करा म्हणजे तुमचे सर्व दावे फोल ठरतील. रत्नागिरी पालिकेने येत्या काही दिवसांत ठोस कारवाई केली नाही आणि एखाद्या नागरिकाच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील. याबाबत आम्ही थेट पोलिस ठाण्यात तक्रार करू,’ असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.