कोकण

प्रभाग 6 मध्ये पारंपरिक खेळांनी रंगला मंगळागौर

CD

rat८p२४.jpg-
26O62646
रत्नागिरी : शहरातील प्रभाग ६ मध्ये सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित मंगळागौर कार्यक्रमात बोलताना आयोजिका, नगरसेविका मेधा कुळकर्णी. सोबत नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे व नगरसेविका.
------
पारंपरिक खेळांनी रंगली मंगळागौर

नगरसेविका मेधा कुळकर्णी यांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : शहरातील प्रभाग क्र. ६ मध्ये नगरसेविका मेधा कुळकर्णी यांच्या पुढाकाराने सिद्धिविनायक हॉल येथे ‘मंगळागौरीचा साज सख्यांच्या सहवासात’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा साजरा झाला. सुमारे ३५० महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, फुगडी, जोगवा, उखाणे तसेच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी हा मंगळागौरीच्या कार्यक्रम उत्साहात रंगला.
या प्रसंगी सुर्वे यांना जास्वंदीचे रोप देऊन नगरसेविका कुळकर्णी यांनी स्वागत केले. या वेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नगरसेविका प्रीती सुर्वे, नगरसेविका पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, वैभवी खेडेकर, फौजिया मुजावर, प्राची कीर व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होत्या.
नगरसेविका कुळकर्णी म्हणाल्या, नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मला पहिल्यांदाच आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मिळाली असून, त्यासाठी मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. प्रभागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन धावपळीतून थोडीशी उसंत मिळावी, त्यांनी एकत्र यावे, आपल्या कलागुणांना वाव मिळावा आणि मंगळागौरीच्या निमित्ताने सर्व सखींनी मनसोक्त आनंद घ्यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शिवसेना महिला उपशहरप्रमुख प्रिया साळवी, महिला विभागप्रमुख सीमा कदम, संगीता भुवड आणि संगीता सुर्वे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाला विशाखा भिडे, सायली बेर्डे, मीना गर्दे, मंजिरी लिमये, सोनाली सावंत, दीप्ती पंडित, माधुरी सुर्वे, डॉ. मधुरा सावंत, डॉ. दीप्ती कदम, अर्चना मुळे, खरेदी-विक्री संघाच्या संचालिका ऋतुजा कुळकर्णी, अस्मिता सरदेसाई, रसिका तेरेदेसाई, सुहासिनी भोळे, योगिता खांडेकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT