कोकण

शालेय अभ्यासात निरोगी जीवनशैली, आयुर्वेदाचा समावेश करा

CD

शालेय अभ्यासात आयुर्वेदाचा
समावेश करा ः अमेय परुळेकर
सकाळ वृत्तसेवा
​रत्नागिरी, ता. ८ : देशातील आणि राज्यातील शालेय शिक्षणात केवळ शरीरशास्त्र न शिकवता शरीर निरोगी कसे ठेवावे, योग्य आहार-विहार पद्धती आणि आयुर्वेदातील मूलभूत घटकांची माहिती समाविष्ट करावी, अशी मागणी रत्नागिरीतील नागरिक अमेय परुळेकर यांनी केंद्रीय तसेच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
​ब्रिटिशकाळापासून चालत आलेल्या शिक्षणपद्धतीत बदलाची गरज व्यक्त करत त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शाळांमध्ये मानवी शरीराची रचना, अवयव आणि त्यांची कार्ये याबद्दल शिकवले जाते; परंतु शरीर निरोगी ठेवण्यासाठी काय खावे, काय टाळावे आणि आहाराचे नियम काय असावेत या विषयी कोणतेही मार्गदर्शन केले जात नाही. उदा. जेवताना किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावून आजार कसे निर्माण होतात, याचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे.
​तसेच आयुर्वेदानुसार शरीरातील वात, पित्त आणि कफ या तीन मूलभूत घटकांचे महत्त्व आणि त्यांचे संतुलन बिघडल्यास होणारे आजार याबद्दलची माहिती ४थी ते १०वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात दरवर्षी टप्प्याटप्प्याने समाविष्ट करावी जेणेकरून भावी पिढी निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगू शकेल, अशी विनंती परुळेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT