कोकण

ज्ञानाबरोबर कौशल्याची जोड आवश्यक

CD

rat९p५.jpg-
26O62779
रत्नागिरी : देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात गुणगौरव कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. नरेंद्र तेंडोलकर. सोबत श्रीराम भावे, प्राचार्य मधुरा पाटील व प्राध्यापक आदी.
---
ज्ञानासोबत कौशल्याची जोड द्या
डॉ. तेंडोलकर ः विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : विद्यार्थ्यांनी विषयाच्या ज्ञानाबरोबर जर कौशल्याची जोड दिली तर भविष्य नक्कीच सुखकारक होईल, असे प्रतिपादन देवरूखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी भारत शिक्षण मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, प्र. प्राचार्य मधुरा पाटील व शिक्षक उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या तृतीय वर्ष कला शाखेतील स्वराज्ञी तांबे हिला विनय परांजपे यांच्यावतीने दिले जाणारे प्रा. एन. वाय. कुलकर्णी पारितोषिक प्रदान करण्यात आले. अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मीरा खातू हिला प्रा. शालिनी मेनन पारितोषिक दिले गेले. वाणिज्य शाखेतील अकाउंट विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आयुष चव्हाणला प्रा. हरिप्रसाद शिवलाल लड्डा पारितोषिक प्रदान केले. भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर यांच्याकडून तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT