कोकण

-शाळा-महाविद्यालयात तंबाखूविरोधी जनजागृती करा

CD

- rat९p११.JPG-
26O62788
रत्नागिरी ः जिल्हा समन्वय तथा सनियंत्रण समितीची आढावा बैठकीत मार्गदर्शन कराताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल.
---
युवकांच्या व्यसनाला आळा घाला
मनुज जिंदल ः तंबाखूविरोधात कडक पाऊल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम, उद्‍भवणारे विविध आजार तसेच युवकांमध्ये वाढत असलेले व्यसनाधीनतेचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समन्वय तथा सनियंत्रण समितीची आढावा सभा झाली. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील तंबाखू नियंत्रण धोरणाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. शाळा व महाविद्यालयांमध्ये तंबाखूविरोधी व्याख्याने, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि समुपदेशन सत्रे नियमित आयोजित करण्यात यावीत. विद्यार्थ्यांना तंबाखूमुळे होणारे कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनविकारांची शास्त्रीय माहिती देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले. तसेच शैक्षणिक संस्थांचा परिसर पूर्णपणे तंबाखूमुक्त राहील याची दक्षता घ्यावी. शाळा/महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमित पाहणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. तंबाखू नियंत्रण कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करा, आदेश त्यांनी दिले.
---
तंबाखूला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार
युवकांमध्ये व्यसनाची सुरुवात होऊ न देणे आणि व्यसनाधीन व्यक्तींना योग्य समुपदेशन व उपचार उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर असेल. विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन ‘तंबाखूला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार’ हा संदेश प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवून तंबाखूमुक्त पिढी घडवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A Squad: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार हार्दिक पांड्या; ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय अ संघ जाहीर

DK Shivakumar: मंत्र्यावर EDची रेड पडताच मुख्यमंत्री डीके शिवकुमार संतापले; म्हणाले, आता आम्ही घाबरणार नाही...

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

SCROLL FOR NEXT