कोकण

कोकणातील 24 नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पाऊल

CD

-rat९p३०.jpg, rat९p३१.jpg-
P26O62848, 26O62849
रत्नागिरी ः पोमेंडी खुर्द आणि सोमेश्वर गावाला जोडणाऱ्या पुलाजवळ काजळी नदीत प्रचंड गाळ साचल्याने दोन्ही गावातील शेतीचे नुकसान होत आहे.
---
कोकणातील २४ नद्यांचे पुनरुज्जीवन
‘चला जाणूया नदीला’ उपक्रम ; शासकीय अन् सामाजिक एकत्रीकरणाचे पहिले पाऊल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः पश्चिम घाटातून अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांच्या बदलत्या परिसंस्थेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासह पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या संवर्धनासाठी व्यापक कृती आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत कोकणातील २४हून अधिक प्रमुख नदी, खोऱ्यांचा समावेश केला असून, त्यात स्थानिक अभ्यासक, शेतकरी यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह आणि ‘जल बिरादरी’ टीमच्या तांत्रिक व सामाजिक सहकार्याने या अभियानाची पूर्वतयारी गतिमान झाली आहे. जिल्ह्यातील नद्यांचे आरोग्य, पाण्याचा ताळेबंद आणि स्थानिक समस्यांवर प्रशासकीय पातळीवरून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. कोकणातील नद्या लांबीने कमी; परंतु तीव्र उताराच्या असल्याने पावसाळ्यात पाण्याचा जलद विसर्ग होतो. त्यामुळे उन्हाळ्यात या भागात भूजल पातळी घटणे आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणे, हा विरोधाभास दरवर्षी दिसून येतो. वाघोटण, अर्जुना, मुचकुंदी, काजळी, बाव, शास्त्री, वाशिष्ठी, जगबुडी, सावित्री या मुख्य नद्यांसह नारिंगी, तांबी, धावती, वैतरणा, शिव, भारजा, जोग, केव, चोरद, नळकडी, मृदानी, बोर, गोदावरी, बेन, सप्तलिंगी आणि नावेरी या सर्व लहान-मोठ्या पाणलोट क्षेत्रांतील महसुली गावांचा शास्त्रीय अभ्यास केला जात आहे. नदी पुनरुज्जीवनात स्थानिक पातळीवर जलसंधारणाची कामे निश्चित करणे, नदीपात्रातील गाळ व अनधिकृत उत्खनन रोखण्यावर भर देणे, नदीकाठच्या गावांतील नागरिकांना ‘नदी प्रहरी’ म्हणून सक्षम करणे यावर भर दिला जाणार आहे. नदी, खोऱ्यांचा सुक्ष्म आराखडा तयार करून प्रशासकीय धोरणात त्यांचा समावेश करण्याची ही सामाजिक-शासकीय संयुक्त मोहीम ठरणार आहे.
---
समाजघटकांना एकत्र आणणार
काजळी, शास्त्री, मुचकुंदी, वाशिष्टीसारख्या नद्यांचा यापूर्वी अभ्यास झालेला आहे. काजळी आणि वाशिष्टी नदीपात्रात काही ठिकाणी तुटक स्वरूपात कामे झाली असली तरी बहुतांश नद्यांची पात्रे आणि कोंडी गाळाने भरलेली आहेत. १०० वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे नद्यांमधून जलवाहतूक चालायची ती परिस्थिती पुन्हा निर्माण करण्यासाठी नद्यांमधील गाळ काढणे आणि अडथळे दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ कागदी अभ्यास न करता आता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जाणार आहे. या अभियानात केवळ सरकारी यंत्रणाच नाही तर अभ्यासक, शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि संपूर्ण समाजघटकांना एकत्र आणले जाणार आहे. यासाठी जलक्षेत्रातील अर्ज मागवले आहेत. या अभियानात सहभागी होण्यासाठी नदी जोडप्रकल्पाचे अशासकीय राज्यस्तरीय सदस्य डॉ. सुमंत पांडे, नदीप्रहरी व अशासकीय समिती सदस्य रोहन इंगळे यांच्याकडे संपर्क साधा, असे आवाहन केले आहे.
----
कोट १
पालघरमधील वैतरणा नदीपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीपर्यंतच्या सर्व प्रमुख नद्यांचा नदीजोड प्रकल्पात समावेश केला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला जलसंपदा विभाग आणि राज्यशासनाने सकारात्मक होकार दिला असून, हा प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांनी या विषयाला प्राधान्य दिले असून, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून यावर संशोधन व अभ्यास सुरू आहे.

- डॉ. सुमंत पांडे, अशासकीय राज्यस्तरीय सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT