कोकण

गणरायाच्या रूपामागे कारागिरांचे कष्ट

CD

-rat९p१९.jpg-
26O62818
राजापूर ः गणेशमूर्ती रंगवताना मूर्तिकार अनंत आडविलकर.
----
वेध गणेशोत्सवाचे -----------लोगो

गणरायाच्या रूपामागे कारागिरांचे हात
दीड-दोन महिन्यांची मेहनत; भक्तांच्या पसंतीनुसार घडवावी लागते मूर्ती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने घरोघरी सजावटीची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्ती कार्यशाळांमध्येही गेल्या दोन महिन्यांपासून कारागिरांची दिवस-रात्र लगबग सुरू असून, शाडूची आणि पीओपीपासून गणरायाचे मनमोहक रूप साकारले जात आहे. भाविकांच्या मागणीनुसार गणेशमूर्तीच्या आकारापासून रंग, धोतर, डोळे, मुकुट आणि नक्षीकामात विविध बदल केले जातात. कच्च्या मूर्तीला आकार देणे, फिनिशिंग, रंगकाम, नक्षीकाम आणि अखेरीस डोळे रंगवणे अशा अनेक टप्प्यांतून मूर्ती साकारते. या प्रत्येक टप्प्यावर अनेक कारागिरांचा सहभाग असतो.
मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांची ठेवण, भुवयांची रचना, मुकुटावरील नक्षीकाम आणि वस्त्रांची रंगसंगती यामुळे गणरायाच्या रूपाला वेगळे व्यक्तिमत्त्व मिळते. त्यामुळे प्रत्येक बारकाव्यावर कारागिरांना कौशल्याने आणि संयमाने काम करावे लागते. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी मूर्तीला अंतिम रूप मिळत असले तरी तिच्यामागे दीड-दोन महिन्यांची मेहनत असते. भक्तांच्या नजरा गणरायाच्या देखण्या रूपावर खिळतात; मात्र ते रूप साकारणाऱ्या मूर्तिकारांच्या श्रमाचे हात बहुतांशवेळा पडद्यामागेच राहतात.
------
कोट १
गणेशभक्ताच्या घरी विराजमान होत असलेली मूर्ती घडण्यापूर्वी ती विविध टप्प्यातून जाते. कच्च्या मूर्तीची निर्मिती, फिनिशिग, रंगकाम, नक्षीकाम आदी कामे करावी लागतात. भक्तांच्या मागणीप्रमाणे मूर्ती बनवली जात असून, त्या मूर्तीमध्ये भक्ताचे आपलेपण रुजवावे लागते तेव्हा खऱ्या अर्थाने मूर्ती घडते.

-राजेश घडशी, मूर्तिकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT