कोकण

धने अन् धुरी यांना सुवर्ण

CD

-rat९p१५.JPG-
26O62812
सावर्डे : विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना विद्यालयाचे मार्गदर्शक शिक्षक
---
‘तायक्वांदो’त गंधर्व धने, श्रीपाद धुरी यांना सुवर्ण
सावर्डे ः शालेय तायक्वांदो स्पर्धेत गंधर्व धने आणि श्रीपाद धुरी यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. तसेच समर्थ सोनवणे, अनघा कांबळे, अश्विनी मुरूडकर आणि दर्शन कदम यांनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत धने आणि धुरी यांची राजापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा चिपळूण येथील बांदल येथे झाली. विजेते विद्यार्थी सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आहेत. क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.


सावर्डे विद्यालयात साक्षरता दिनानिमित्त फेरी
सावर्डे ः जागतिक साक्षरता दिनानिमित्त गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयात प्रभातफेरी काढून साक्षरतेबाबत जनजागृती करण्यात आली. साक्षरतेचे महत्त्व, शिक्षणाची गरज तसेच निरक्षरता निर्मूलनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सकाळी विद्यार्थ्यांनी हातात साक्षरतेचे संदेश असलेले फलक घेऊन प्रभातफेरी काढली. शिक्षकांनीही साक्षरतेमुळे व्यक्तीच्या जीवनात होणारे सकारात्मक बदल, ज्ञानप्राप्ती आणि सामाजिक विकासाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


तायक्वांदो स्पर्धेत बांदल हायस्कूलचे यश
चिपळूण ः शहरातील बांदल हायस्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत स्वर घाग आणि मयुरेश लाड यांनी सुवर्णपदक तर समर्थ लाड याने रौप्यपदक पटकावले. या तिन्ही विद्यार्थ्यांची राजापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्वर घाग याने यापूर्वीही तायक्वांदो स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत त्याने आपल्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. मयुरेश लाड आणि समर्थ लाड हे सावर्डे येथील अमेय क्लासेसमध्ये प्रशिक्षक भरत कर्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहेत.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT