कोकण

-राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये कबनूरकर स्कूलची मोहोर

CD

-rat९p२२.jpg-
26O62823
साखरपा : पदक विजेते कबनूरकर स्कूलचे विद्यार्थ्यांसह प्रशिक्षक तेजस साळुंखे.
-------
कराटेत कबनूरकर स्कूलचा दबदबा

राज्यस्तरीय स्पर्धेत १२ पदकांची कमाई

सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १० : शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या १२व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कोंडगाव येथील कबनूरकर स्कूलच्या विद्यार्थ्यानी यश संपादन केले आहे. स्पर्धेत चार सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह एकूण १२ पदके विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत.
शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे १२वी राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धा केर्ले येथे झाली. स्पर्धेत कबनूरकर स्कूलच्या १० विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. कुमेती प्रकारात ओम शेट्ये, तनिश गांधी आणि तालिब रमदुल यांनी सुवर्णपदके मिळवली. उमंग भिंगार्डे, विघ्नेश राजापूरकर, शुभम होनमाने, श्लोक राव, अफताब रमदुल यांनी रौप्यपदके तर स्वरा कबनूरकर आणि क्षितिजा कोलते यांनी कास्यपदक मिळवली. काता प्रकारात ओम शेट्ये याने सुवर्ण तर उमंग भिंगार्डे याने रौप्यपदक पटकावत दोघांनीही दुहेरी पदके पटकावली.
कबनूरकर स्कूलच्या तीन माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले. पायल मावेनूर, भार्गवी सुर्वे आणि श्रावणी गांगण या तीन माजी विद्यार्थी आणि कराटे खेळाडूंनी या स्पर्धेत पंच म्हणून भूमिका बजावली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT