कोकण

गणित-विज्ञानात रत्नागिरी तालुका आघाडीवर

CD

गणित-विज्ञानात रत्नागिरी आघाडीवर
डॉ. नारळीकर समृद्धी कार्यक्रम; अध्ययनात १,३२२ विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांची आवड निर्माण करण्यासाठी आणि अध्ययन समृद्धीसाठी राबवण्यात येत असलेल्या ‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमा’त रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ६ सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, जिल्हाभरातील शाळा आणि विद्यार्थ्यांच्या नोंदणीत मोठी वाढ झाली असून, यात रत्नागिरी तालुक्याने अव्वल स्थान पटकावले आहे तर संगमेश्वर तालुक्याने द्वितीय स्थान कायम ठेवले आहे.
शिक्षण विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात एकूण १ हजार ८९५ शाळांपैकी ७९ टक्के शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, एकूण ५४ हजार १५२ पटसंख्येपैकी ३३ हजार ८१५ म्हणजे ६२ टक्के विद्यार्थ्यांनी या उपक्रमात नोंदणी केली आहे. यापैकी १ हजार ३२२ विद्यार्थी प्रत्यक्ष अध्ययनात सक्रिय सहभागी झाले आहेत. हे प्रमाण दोन टक्के आहे. शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे ही नोंदणी यशस्वी झाली आहे. आता केवळ नोंदणीपुरते मर्यादित न राहता नोंदणीकृत प्रत्येक विद्यार्थ्याला गणित व विज्ञानाच्या अध्ययनात प्रत्यक्ष ‘सक्रिय’ सहभागी करून घेण्यासाठी सर्व तालुक्यांमध्ये विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
---
तालुका*एकूण शाळा*पटसंख्या*नोंदणीकृत विद्यार्थी*सक्रिय विद्यार्थी
रत्नागिरी* २९६* ११,३०५* ८,८५९* ६८१
संगमेश्वर* २८३* ६,२२३* ४,८७६* १४६
गुहागर* १५८* ४,७८१* २,५६९* ११२
मंडणगड* ११५* २,८७९* १,५८६* ४६
राजापूर* २५६* ६,१७५* ४,२४२* ९७
लांजा* १६१* ४,९१२* २,८०९* १७
चिपळूण* २३३* ६,६५४* ४,०८६* ९१
खेड* २२०* ५,२०८* २,४०५* ३७
दापोली* १७३* ६,०१५* २,३८३* ९५
---
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT