कोकण

दिव्यांग बांधवांचे प्रश्न तातडीने मार्गी लावणार

CD

- rat१०p१२.jpg-
26O63010
रत्नागिरी ः जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला उपस्थित दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी.
---
दिव्यांग बांधवांचे प्रश्न मार्गी लावणार
ॲड. सुयोग कांबळे ः लवकरच स्वतंत्र बैठक

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः ‘जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या योजनांमधील अडीअडचणी तत्काळ सोडवल्या जातील. संघटनेने प्रश्न व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन ते लवकरात लवकर मार्गी लावले जातील,’ असे आश्वासन समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे यांनी दिले. तसेच उत्तर रत्नागिरीतील म्हणजेच मंडणगड, दापोली, चिपळूण, खेड व गुहागर या तालुक्यांतील दिव्यांग बांधवांसाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल, अशी माहितीही ॲड. कांबळे यांनी दिली.
जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. ९) रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक झाली. या बैठकीत दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या पाच टक्के दिव्यांग निधी योजनेचा आढावा घेण्यात आला, तसेच त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीदरम्यान पाच टक्के निधी योजनेतून दिव्यांगांना व्यवसायासाठी मिळणारा लाभ खरोखरच गरजू बांधवांपर्यंत पोहोचतो का, याचा आढावा घेण्यात आला. तसेच २०२५-२६ या वर्षातील लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे का? त्यांनी वस्तू खरेदीच्या पावत्या व फोटो विभागाकडे सादर केले आहेत का? याची माहिती घेण्यात आली. ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या बांधवांना नियमानुसार कशा प्रकारे लाभ देता येईल, यावरही चर्चा झाली. या प्रसंगी दिव्यांगांनी विविध मागण्या केल्या. त्यात जिल्ह्यात आयोजित केलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याची तक्रार करण्यात आली. यामध्ये सुधारणा करा, अशी मागणी केली आहे. यावर सभापती ॲड. कांबळे यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ, हर्षदा गावडे, उषा सावंत, जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी मल्लिनाथ कांबळे, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
---
दिव्यांगांच्या प्रमुख मागण्या
* स्वतंत्र सहाय्यता कक्ष, मार्गदर्शन केंद्र व थेरपी सेंटरसाठी सरकारी जागा द्या
* शासकीय भरतीत दिव्यांगांना जास्तीत जास्त संधी द्यावी
* व्यवसायासाठी ठिकठिकाणी स्टॉल उपलब्ध करून द्या
* दिव्यांगांचे घरकुलांचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT