कोकण

सर्वंकषमध्ये सेंद्रिय खतनिर्मितीची कार्यशाळा

CD

rat१०p३.jpg-
26O62998
रत्नागिरी ः​मंदार प्रभुदेसाई यांनी सेंद्रिय कचऱ्याचे विघटन, कंपोस्टचे महत्त्व आणि त्याची प्रक्रिया यावर माहिती देत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवले.
---
कचऱ्यापासून विद्यार्थ्यांनी बनवले खत

‘सर्वंकष’चे पाऊल ग्रीन स्कूल’च्या दिशेने पाऊल

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : शहरालगतच्या कुर्ली येथील सर्वंकष विद्यामंदिरमध्ये ‘स्वयंपाकघरातील सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मिती’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रत्यक्ष कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक कौशल्य आत्मसात केले. बदलत्या हवामानात सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि जमिनीचा कस टिकवणे यांसारख्या गंभीर पर्यावरणीय मुद्द्यांवर या वेळी मार्गदर्शन करण्यात आले.
शाळेच्या ‘इकोक्लब’ आणि कौशल्य शिक्षणातील ‘कॉम्पोझिट स्किल लॅब’ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सीबीएसई बोर्डाच्या कौशल्याधारित शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम असून, शाळेला ‘ग्रीन स्कूल’ बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. पर्यावरणतज्ज्ञ मंदार प्रभुदेसाई यांनी उपस्थित राहून सेंद्रिय कचऱ्याचे विघटन, कंपोस्टचे महत्त्व आणि खतनिर्मितीची प्रक्रिया यावर सविस्तर माहिती दिली. ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकात थेट सहभाग घेऊन स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून स्वतः कंपोस्ट तयार केले. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे प्रभुदेसाई यांनी समर्पक निरसन केले. शिक्षक जॅरेड डायस यांनी सूत्रसंचालन केले.
----
कोट
‘सेंद्रिय शेती आणि शाश्वत जीवनशैली ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. विद्यार्थ्यांना घरच्या घरी व शाळेत कंपोस्ट निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्याच्यादृष्टीने संस्थेने उचललेले हे एक सकारात्मक पाऊल आहे.’

- मोनिका जयस्वाल, मुख्याध्यापिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT