कोकण

स्पर्धा परीक्षेत रत्नागिरी जिल्हा रत्नांची खाण व्हावा

CD

- rat१०p५.jpg -
26O63001
रत्नागिरी ः एनएमएमएस प्रश्नपत्रिका संचाचे प्रकाशन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, सोबत शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, अय्युब मुल्ला, संजय चव्हाण आदी.
---

स्पर्धा परीक्षेतही चमकू दे ‘रत्नागिरी’
वैदेही रानडे ः जिल्ह्यातील शाळांना प्रश्नपत्रिका संच मोफत वितरण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः ‘रत्नागिरी जिल्हा हा खऱ्या अर्थाने रत्नांची खाण म्हणून ओळखला जातो. कोकण विभागीय मंडळ १०वी व १२वीच्या परीक्षेत आजपर्यंत राज्यात अव्वल ठरले असून, येथील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे. याच बुद्धिमत्तेच्या जोरावर शालेय स्पर्धा परीक्षेतही रत्नागिरी जिल्हा ‘रत्नांची खाण’ व्हावा,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा’ प्रश्नपत्रिका संच प्रकाशन सोहळा व जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि माध्यमिक शिक्षण विभाग (जिल्हा परिषद, रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या वेळी रानडे म्हणाल्या, ‘केवळ भरपूर अभ्यास करत बसण्यापेक्षा अभ्यासाचे योग्य तंत्र जाणून घेतल्यास कमी वेळेत जास्त अभ्यास होऊ शकतो आणि त्याचे रूपांतर उत्तम गुणांमध्ये होते. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळून जिल्ह्यातील शिष्यवृत्तिधारकांचा टक्का नक्कीच वाढेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘एनएमएमएस’ प्रश्नपत्रिका संचाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले व जिल्ह्यातील सर्व शाळांना हा संच मोफत वितरित करण्यात आला. या प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्युब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, राज्य महामंडळ कोषाध्यक्ष संदेश राऊत, सचिव महेश पाटकर, कार्यशाळा मार्गदर्शक आबासाहेब पसारे, राजेंद्र सुतार, सुनील तांबेकर, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांच्यासह संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष, सचिव आणि जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------
कोट
माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मुख्याध्यापक संघाने प्रकाशित केलेला हा प्रश्नपत्रिका संच जिल्ह्यातील शाळा, विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना दिशा देणारा आहे. हा संच सर्व शाळांना मोफत देण्याची मुख्याध्यापक संघाची भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे.

- नंदकुमार मुरकर, शिक्षण व वित्त सभापती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT