कोकण

गेट, जॅम परीक्षांबाबत गोगटे महाविद्यालयात मार्गदर्शन

CD

गेट, जॅम परीक्षांबाबत
गोगटे महाविद्यालयात मार्गदर्शन
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्यावतीने पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गेट आणि जॅम परीक्षांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. आयआयटी बॉम्बेचे अधिकृत प्रतिनिधी करमवीर सिंग आणि सुहास घोडाम यांनी मार्गदर्शन केले. फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेशपरीक्षांचे स्वरूप, अभ्यासाची रणनीती, पात्रता आणि उच्चशिक्षणातील संधी यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. विज्ञान विभागाच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना या परीक्षांचे शैक्षणिक व व्यावसायिक जीवनातील महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले. या सत्राला बीएससी तृतीय वर्ष व एमएससी भाग १ व २ मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
मत्स्य अभियांत्रिकी विद्यालयात
पारितोषिक वितरण
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे शिक्षकदिन व पारितोषिक वितरण समारंभ झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. सुशील शिवलकर, इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्षा सुवर्णा चौधरी उपस्थित होत्या. प्रस्तावना विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष नीलेश मिरजकर यांनी केली. सुवर्णा चौधरी यांनी शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, आणि विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी शिक्षक-विद्यार्थी संबंध अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कौशल्य, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

इमोशनलेस असतात ‘या’ राशीचे लोक! समोरच्याने कितीही प्रेम दिलं तरी पडत नाही फरक; पुढे होतो मोठा पश्चात्ताप, आयुष्यात साथ देत नाही कोणी

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

SCROLL FOR NEXT