- rat११p३०.jpg-
26O63354
अनिकेत वाडकर
अपयशाला हरवून अनिकेतची ‘लेफ्टनंट’पदी झेप
१४व्या प्रयत्नात यश; गया येथील ‘पासिंग परेड’नंतर शिक्कामोर्तब
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : अपयशाने खचून न जाता सातत्य, संयम आणि अथक परिश्रमांच्या बळावर ध्येय कसे साध्य करता येते याचे उदाहरण रत्नागिरीच्या अनिकेत वाडकर याने घालून दिले आहे. सलग १३ वेळा आलेल्या अपयशावर मात करत १४व्या प्रयत्नात त्याने भारतीय सैन्यामध्ये ‘लेफ्टनंट’ पदाला गवसणी घातली आहे. ५ सप्टेंबर रोजी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, गया येथे पार पडलेल्या पासिंग आऊट परेडनंतर त्याची भारतीय लष्कराच्या ‘कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्स’मध्ये अधिकारी म्हणून अधिकृत नियुक्ती झाली आहे.
मूळचे सावंतवाडी येथील रहिवासी असलेले व कोकण रेल्वेत सेवेत असल्याने सध्या रत्नागिरीत वास्तव्यास असलेले नीलेश वाडकर व स्नेहा वाडकर यांचा अनिकेत हा सुपुत्र आहे. लहानपणापासूनच सैनिकी गणवेश, शिस्त आणि देशसेवेचे आकर्षण असलेल्या अनिकेतने शालेय जीवनात एनसीसीमध्ये प्रवेश घेतला. तेथूनच त्याच्या मनात लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न आकारास आले. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच त्याने या दिशेने तयारी सुरू केली. अनिकेतचा लष्करी अधिकारी होण्याचा प्रवास सोपा नव्हता. पुढील पाच वर्षे त्याच्या संयमाची आणि जिद्दीची कठीण परीक्षा पाहणारी ठरली. अनेकदा लेखी परीक्षा आणि एसएसबी मुलाखतींमध्ये अपयश आले. दोनवेळा तर एसएसबी पार करूनही अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळाले नाही; मात्र, ‘अपयश म्हणजे पराभव नव्हे तर पुन्हा उभे राहण्याची संधी’ हा विचार मनात ठेवून त्याने हार मानली नाही. अनिकेतच्या या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच रत्नागिरी व सावंतवाडी परिसरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
---
अभिमानाचा क्षण
गणवेश मिळवणे हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे; मात्र त्याची प्रतिष्ठा आणि सन्मान जपण्याची खरी जबाबदारी आजपासून सुरू झाली आहे, अशी भावना अनिकेत यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.