कोकण

प्रारूप मतदार यादी ही अंतिम यादी नव्हे

CD

‘प्रारूप यादी’ ही अंतिम यादी नव्हे
प्रशासनाचा खुलासा; अंतिम यादी नोव्हेंबरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : राज्यात सध्या सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (एसआयआर) मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील मतदारांच्या संख्येवरून माध्यमांमध्ये विविध दावे केले जात आहेत. २०२४च्या विधानसभा निवडणुकीतील एकूण मतांपेक्षा प्रारूप यादीत मतदार कमी असल्याचे प्रशासनाने खंडन केले आहे. ही केवळ प्रारूप (ड्राफ्ट) यादी असून, अंतिम यादी नसल्याचा महत्त्वाचा खुलासा प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात दिलेल्या पत्त्यावर मतदार प्रत्यक्ष राहतात का, याची सत्यता तपासण्यावर मुख्य भर देण्यात आला होता. त्यामुळे मूळ पत्त्यावर न राहणारे लोक, मृत मतदार आणि दुबार नोंदी या प्रारूप यादीतून वगळण्यात आल्या आहेत. जे मतदार स्थलांतरित झाले आहेत; पण महाराष्ट्रातच राहत आहेत त्यांना सध्याच्या राहत्या ठिकाणच्या यादीत नाव नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच १ ऑक्टोबर २०२४ नंतर वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवीन मतदारांची नोंदणी प्रक्रियाही सध्या वेगाने सुरू आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, राहत्या ठिकाणावरून दीर्घकाळ अनुपस्थित असण्यासारख्या कारणांमुळे पहिल्या टप्प्यात ज्यांची नावे समाविष्ट झाली नसतील ते लोकसुद्धा आता मतदार नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. सध्याचा टप्पा हा पूर्णपणे नवीन नावे समाविष्ट करण्यावर केंद्रित असून, या द्वारे एकही पात्र नागरिक मतदार यादीतून सुटणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जात आहे.
ही मोहीम नोव्हेंबर २०२६च्या सुरुवातीला पूर्ण होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे सध्याच्या केवळ प्रारूप यादीची तुलना आधीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाच्या अंतिम आकडेवारीशी करणे पूर्णपणे अयोग्य आणि चुकीचे ठरेल. कोणतेही विश्लेषण किंवा तुलना करायची असल्यास ती अंतिम यादी अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यानंतरच करावी. अपुऱ्या माहितीवरून घाईघाईने निष्कर्ष काढल्यास गैरसमज पसरू शकतात, त्यामुळे नागरिक, राजकीय घटक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अंतिम यादी जाहीर होईपर्यंत वाट पाहावी, असे नम्र आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT