सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी गमरे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ : शहरातील पंचायत समितीशेजारील रमाई माता सभागृहात चिपळूण तालुका सरपंच संघटनेची सभा झाली. या सभेत संघटनेची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. त्यानुसार सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी बामणोली गावचे सरपंच सुदेश गमरे यांची निवड तर सचिवपदी आबिटगावचे सरपंच सुहास भागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघटनेचे माजी अध्यक्ष योगेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच संघटनेची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. या वेळी पहिल्या कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे या सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. गमरे हे बामणोली येथे दुसऱ्यांदा सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यांना ग्रामपंचायत कामकाजाचा मोठा अनुभव आहे. संघटनेच्या उपाध्यक्ष राघो आंबवकर, स्नेहा वाजे, सहसचिव नीता शिंदे, खजिनदार आदिती गुडेकर, संघटक चंद्रकांत तांडकर, सदस्य म्हणून गायत्री जोगळे, नम्रता मोहिते आणि आत्माराम बांबाडे यांची निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीचे सर्वांनी अभिनंदन केले. या सभेला माजी अध्यक्ष योगेश शिर्के, माजी सचिव विकास गमरे, माजी सल्लागार सुनील हळदणकर, तन्वी खेडेकर, महेश आदावडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.