कोकण

शिवनदी पुलावर सोलर दिवे बसविण्याची मागणी

CD

शिवनदी पुलावर सोलर दिवे बसवा
नगरसेवक निहार कोवळे यांचे आमदार सामंत यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः शहरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शिवनदी पुलावर रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याने नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी पुलावर सौरऊर्जेवरील (सोलर) पथदिवे बसवावेत आणि त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक निहार कोवळे यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे केली आहे. आमदारांनी या मागणीची तातडीने दखल घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
शिवनदी पूल हा चिपळूण शहरातील वाहतुकीचा मुख्य आणि वर्दळीचा मार्ग आहे. या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची आणि पादचाऱ्यांची ये-जा सुरू असते. मात्र, पुलावर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. विशेषतः पावसाळ्यात अंधारामुळे अपघातांचा धोका अधिक वाढतो. शहराची वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या लक्षात घेता या पुलावर कायमस्वरूपी प्रकाशव्यवस्था असणे गरजेचे आहे. पारंपरिक पथदिव्यांपेक्षा सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसवल्यास विजेची बचत तर होईलच, शिवाय वीजपुरवठा खंडित झाल तरी पुलावर अंधार पडणार नाही. पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन फायदेशीर ठरणारा हा उपक्रम राबवण्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा, असे साकडे नगरसेवक कोवळे यांनी घातले आहे.

चौकट
आमदारांचे आश्‍वासन
या मागणीवर बोलताना आमदार किरण सामंत यांनी, शिवनदी पुलावरील प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असा विश्वास दिला. आमदारांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे शिवनदी पुलावरील अंधाराचे साम्राज्य लवकरच दूर होऊन वाहनचालक व नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

रस्त्यावर झोपून काढले दिवस, आज दीड एकरमध्ये उभा आहे आलिशान बंगला; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या घराची झलक

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

SCROLL FOR NEXT