खेडमध्ये तीन आरोग्य तपासणी केंद्रे
खेड ः गणेशोत्सवानिमित्त कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खेड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि जेसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने २४ तास मोफत आरोग्य तपासणी व उपचार सेवा सुरू केली आहे. भरणे नाका, खेड रेल्वे स्थानक आणि लवेल-दाभिळ नाका या तीन प्रमुख ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्रे उभारली आहेत. ही सेवा २५ सप्टेंबरपर्यंत चोवीस तास सुरू राहणार आहे. या केंद्रांवर डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक यांच्यासह रूग्णवाहिका अशा सुविधा उपलब्ध आहेत. या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी गटविकास अधिकारी विजय करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल, डॉ. अक्षय पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे, जेसीआयचे अध्यक्ष अमित नामुष्टे, माजी अध्यक्ष अमित कदम, कार्यक्रम प्रमुख शंकर पार्टे, आरोग्य निरीक्षक निलेश सकपाळ, दत्ताराम पड्याळ, सीएचओ श्री. शेळके, प्राची आखाडे, दीपाली शिंदे, मिथुन यादव आदी उपस्थित होते.
उर्दू हायस्कूलमध्ये हिंदी अभिव्यक्ती महोत्सव
लांजा ः शहरातील मोहम्मदिया एज्युकेशन ट्रस्ट लांजा संचलित ‘अल-अमीन उर्दू हायस्कूल लांजा’ या प्रशालेमध्ये हिंदी दिना निमित्त ‘हिंदी अभिव्यक्ती महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवांतर्गत प्राथमिक गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) साठी हिंदी कहानीकथन आणि हिंदी शुद्धलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १० वी) साठी निबंधलेखन, वक्तृत्व आणि हिंदी शुद्धलेखन स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा ः प्राथमिक गटात (परिच्छेद लेखन)- मारिया डबीर, महिन चिकाटे, सिद्दीकी हजरा शाहबुद्दीन, प्राथमिक गट (कहानी कथन)- सिद्दीका खान, हाफसा ठाकूर, राजू इमाद नाझीम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.