कोकण

देवरुखमध्ये धोकादायक यू-टर्नवर बहिर्वक्र आरसे

CD

- rat१४p४.jpg, rat१४p५.jpg-
26O63824, P26O63825
देवरुख ः शहरातील धोकादायक यू-टर्न.
-----
धोकादायक रस्त्यावर बहिर्वक्र आरसे
अक्षय झेपले यांचा उपक्रम ; देवरुखकरांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
देवरुख, ता. १४ ः शहरातील वॉर्ड क्रमांक १० मधील धोकादायक ‘यू-टर्न’वर सतत होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा न करता नगरसेवक अक्षय अजय झेपले यांनी स्वखर्चातून ‘कॉन्व्हेक्स आरसे’ (बहिर्वक्र आरसे) बसवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामुळे वाहनचालक, पादचारी व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देवरूख शहरात काही ठिकाणी धोकादायक वळणावर समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसत नसल्याने सातत्याने अपघाताचा धोका निर्माण होत होता. वाहनचालकांसह ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांनाही या ठिकाणी जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत होते. यू-टर्नवर अचानक समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने दुचाकी, चारचाकी तसेच मोठ्या वाहनांच्या चालकांसमोर अपघाताचे संकट होते. आता दोन्ही दिशांनी येणारी वाहने आरशांच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसणार असल्याने वाहनचालकांना सुरक्षितपणे वळण घेणे शक्य होणार आहे. विशेषतः पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झालेली आहे. ‘जनतेची सुरक्षितता हीच खरी जबाबदारी’ या भावनेतून नगरसेवक अक्षय झेपले यांनी स्वतःच्या खर्चातून केलेल्या या कामाचे वॉर्ड क्रमांक १० मधील नागरिकांकडून स्वागत होत आहे.
---
अपघातांना बसणार आळा
धोकादायक वळणावरील समोरून येणारी वाहने बहिर्वक्र आरशामध्ये दिसत असल्याने अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे. याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

Wani News : मार्कंडेय पर्वतावर पुन्हा ‘बंदी’चा डोंगर! चार वर्षांत धोकादायक शिड्या-पायवाटांची दुरुस्ती नाही, भाविकांचा संताप

SCROLL FOR NEXT