- rat१४p८.jpg-
26O63956
लांजा ः श्रीराम विद्यालयाची आयुक्तस्तरीय पथकाकडून पाहणी.
---
श्रीराम विद्यालय गुणवत्तेत अव्वल
आयुक्तस्तरीय पथकाची पाहणी ; वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १४ ः राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या ‘चला शाळेत जाऊया’ या अभियानांतर्गत लांजा तालुक्यातील ‘श्रीराम विद्यालय, वेरवली बुद्रुक’ येथे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तस्तरीय पथकाने नुकतीच भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत पथकाने विद्यालयाचा शैक्षणिक आणि प्रशासकीय दर्जा उत्कृष्ट असल्याचे निरीक्षण नोंदवत समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेचे आयुक्त महेश चोथे, रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, ‘डायट’चे प्राचार्य सुशील शिवलकर, लांजा गटशिक्षणाधिकारी प्रशांत सोनवले यांच्यासह विविध अधिकारी या पाहणी पथकात सहभागी होते. शाळेत स्पर्धा परीक्षांसाठी शाळेने केलेले नियोजन, जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा, नाट्य प्रशिक्षण आणि आनंदमेळा यांसारख्या उपक्रमांचे पथकाने कौतुक केले.
शालेय परिसरातील वृक्षारोपण, परसबाग आणि भौतिक सुविधांची सविस्तर पाहणी करून समाधान व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी संस्था संचालक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल रेडीज, उपाध्यक्ष पंढरी गुरव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्तस्तरीय पथकाने दिलेल्या या सकारात्मक अभिप्राय बद्दल पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि पालकांनी शाळा प्रशासनाचे कौतुक केले आहे.
---
लोकसहभागाबाबत समाधान
शैक्षणिक उठावाअंतर्गत माजी विद्यार्थी शैलेश डोळस यांनी श्रीराम विद्यालयासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. लोकसहभागामुळे शाळेचा चांगला लाभ होईल, असे आयुक्त चोथे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.