कोकण

कर्जमाफीची दुसऱ्या यादीत 1,442 लाभार्थी पात्र

CD

कर्जमाफीची दुसऱ्या यादीत १,४४२ लाभार्थी
अहिल्यादेवी होळकर योजना ; ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी करणे अनिवार्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकांची दुसरी यादी शुक्रवारी (ता. ११) अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील १ हजार ४४२ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६५७ शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असून, ७८५ शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेचे कर्जदार आहेत.
कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे ‘ॲग्रीस्टॅक नोंदणी’ (फार्मर आयडी) क्रमांक असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही, त्यांनी तत्काळ नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ जाऊन ही नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांनी नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ‘महा ई-सेवा केंद्र’ येथे उपस्थित राहून बायोमेट्रिक किंवा आवश्यक प्रक्रियेद्वारे आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, अशी सूचना करण्यात केली आहे. जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र आणि महा ई-सेवा केंद्राच्या चालकांसाठी या प्रक्रियेबाबतचे ऑनलाइन प्रशिक्षण जिल्हा प्रकल्प कार्यालयामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. यासंबंधीची सविस्तर कार्यपद्धती जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्र आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
---
कोट
पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जिल्ह्यातील सर्व संबंधित ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे कार्यालय व सचिव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, तसेच सर्व राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत नाव आलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.

- राम कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक, रत्नागिरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT