कोकण

जी.एन.एम. निकालात एम.ई.एस. नर्सिंगचे यश

CD

rat१४p१.jpg
६३८२१
श्रावणी उतेकर
------
जी.एन.एम. निकालात
एम.ई.एस. नर्सिंगचे यश
चिपळूण ः जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी तृतीय वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात लोटे येथील एम.ई.एस. कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत श्रावणी उतेकर हिने ८७.६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रिया सामंत हिने ८६.६ टक्के गुणांसह द्वितीय, राजश्री उमराटकर हिने ८६.४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. प्राचार्य मिलिंद काळे, उपप्राचार्य शिवप्रसाद हळेमणी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
---------
डीबीजेमध्ये
हिंदी दिवस समारोह
चिपळूण ः येथील डीबीजे महाविद्यालयामध्ये हिंदी विभागातर्फे हिंदी दिवस समारोह साजरा करण्यात आला. कार्यक्रमात पाटण येथील डॉ. हेमलता काटे यांनी हिंदी : वर्तमान परिदृश्य या विषयावर बोलताना त्यांनी हिंदी भाषेचा इतिहास आण डिजीटल युगात हिंदी भाषेचे महत्व व्यक्त केले. प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगितले. प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. विक्रम वारंग यांनी केले. हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हिंदी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
----------
इटुकली पिटुकली
स्पर्धा उत्साहात
चिपळूण : तालुक्यातील खेरशेत येथील भागीरथीबाई राजेशिर्के सभागृह येथे इटुकली पिटुकली स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. कुटरे येथील श्री सुकाई शिरकाई संस्था आणि राजेशिर्के परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम उपस्थित होत्या. लहान मुलांच्या निरागसतेला, सृजनशीलतेला आणि सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. विविध वयोगटातील चिमुकल्यांनी मनोरंजक स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याचे आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवले. चिमुकल्यांशी संवाद साधताना सौ. पूजा निकम म्हणाल्या, बालपणातील व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच या उपक्रमाच्या यशाची पावती असून भविष्यातही अशा उपक्रमांना नेहमी सहकार्य राहील. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासह विविध पारितोषिके, ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

दगडूशेठ बाप्पाला हे नाव कसं मिळालं? जाणून घ्या दगडूशेठ हलवाईंची कहाणी

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

SCROLL FOR NEXT