कोकण

भडकंबा येथील गणपती नवरात्रोत्सव

CD

- rat१५p६.jpg -
P26O64060
साखरपा : जोशी कुटुंबीयांकडे विराजमान झालेला श्री गणेश, नर्मदा गणेश, पंचधातू गणेश.
- rat१५p७.jpg -
26O64061
भडकंब्यातील जोशी कुटुंबीयांकडे मानाच्या श्री गणेशाचे आगमन.
---
भडकंबा येथील गणपती नवरात्रोत्सव
पिढ्यांची परंपरा; भाद्रपद प्रतिपदेपासून प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १५ : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील जोशी कुटुंबीयांकडे मानाच्या गणेशाचे आगमन झाले आहे. भाद्रपद प्रतिपदेचा गणेशोत्सव म्हणून या गणेशाची ओळख आहे. गेल्या अनेक पिढ्यांची ही परंपरा कुटुंबात जपली जात आहे.
भडकंबा दत्तवाडी येथील जोशी कुटुंब हे मूळचे कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या कराड येथील आहे; पण त्या कुटुंबाच्या अनेक पिढ्या कोकणात येऊन स्थायिक झाल्या. या कुटुंबात भाद्रपद प्रतिपदेला म्हणजे सर्वसाधारण गणेशोत्सव सुरू होण्याच्या तीन दिवस आधीच गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो. प्रतिपदेपासून सुरू होऊन गौरी विसर्जनापर्यंत सुरू राहणारा हा गणेशोत्सव नऊ दिवसांमुळे गणेश नवरात्रोत्सव म्हणूनही ओळखला जातो. गेली जवळपास सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक काळ ही प्रथा जोशी कुटुंबात सुरू आहे. प्रतिपदेच्या मुहूर्तावर ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यानंतर अथर्वशीर्षाच्या एक हजार आवृत्त्या ब्रह्मवृंदातर्फे आळवल्या जातात. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घराण्याच्या देव्हाऱ्यातील पंचधातूची गणेशमूर्ती. या मूर्तीची पूजाही गणेशोत्सव काळात प्रथेप्रमाणे केली जाते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत दुर्मिळ असा नर्मदा गणेश. त्याचीही विधीवत पूजा उत्सवादरम्यान केली जाते.
----
दृष्टिक्षेपात
* मूळचे कृष्णाकाठच्या कराडचे जोशी कुटुंब
* भाद्रपद प्रतिपदेपासून गणेशोत्सवाची परंपरा
* पंचधातूच्या गणेशाची उपासना
* नर्मदा गणेशाचीही विधीवत पूजा करण्याची परंपरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

PhonePe Transaction : ‘फोन पे’ व्यवहार अन् कापडाच्या तुकड्याने उघडला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT