कोकण

आंजर्लेत रानडुकराच्या पिल्लाला जीवदान

CD

आंजर्ले किनाऱ्यावर रानडुकराचे पिल्लू
प्राणीमित्रांची धाव ; नैसर्गिक अधिवासात सोडले
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १५ ः गणेशोत्सवाच्या उत्साहात दापोली तालुक्यातील सुप्रसिद्ध आंजर्ले येथील तरीबंदर समुद्रकिनाऱ्यावर अचानक रानडुकराचे पिल्लू दिसून आले. तसे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र, स्थानिक प्राणीमित्र आणि वनविभागाच्या सतर्कतेमुळे या पिल्लाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश आले आहे.
सोमवारी (ता. १४) सायंकाळी आंजर्ले तरीबंदर किनाऱ्यावर नागरिक भटकंती करत असताना अचानक हे रानडुकराचे पिल्लू तेथे आले आणि उपस्थितांच्या दिशेने येऊ लागले. पिल्लू हल्ला करेल या भीतीने नागरिकांची पळापळ झाली; मात्र, उपस्थितांनी न घाबरता तत्काळ स्थानिक प्राणिमित्रांशी संपर्क साधला. ही माहिती मिळताच आंजर्ले ताडाचाकोंड येथील प्राणीमित्र प्रणीत बाईत, वैभव बाईत आणि चिखलतळे येथील प्रफुल्ल मिसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अत्यंत कौशल्याने त्या पिल्लाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
त्यानंतर पिल्लाची पाहणी करून त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करण्यात आली. वनाधिकारी प्रभू साबणे यांच्या उपस्थितीत या पिल्लाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या यशस्वी मोहिमेत प्राणिमित्रांसह समाजसेवक राजेश जैन आणि स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT