कोकण

लोटेच्या मालवाहतुकीला रेल्वे जोडणीची नवी आशा

CD

लोटेच्या उद्योगांना निर्यातीचा नवा मार्ग

जेएनपीटी जोडणीमुळे मालवाहतुकीला मिळणार गती

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : ‘जेएनपीटी’ बंदराला देशाच्या विविध भागांशी जोडणाऱ्या समर्पित मालवाहतूक रेल्वेमार्गिकेचे महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाल्याने लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील मालवाहतुकीला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. रसायने, औषधनिर्मिती, विशेष रसायने आणि प्रक्रिया उद्योगांमधून देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत जाणाऱ्या मालासाठी रेल्वेवाहतूक फायदेशीर ठरू शकते.
जेएनपीटीमधून दोन स्तरांवर कंटेनर वाहून नेणाऱ्या मालगाड्यांमुळे एका फेरीत मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक शक्य होणार आहे. रस्त्याऐवजी रेल्वेचा वापर वाढल्यास इंधन, वाहतूक खर्च आणि माल पोहोचण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे लोटेतील निर्यातक्षम उद्योगांची स्पर्धात्मकता वाढण्याची अपेक्षा आहे.
लोटे एमआयडीसीमध्ये घरडा केमिकल्स, कन्साय नेरोलॅक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एआयएमसीओ पेस्टिसाइड्स, सुप्रिया लाइफसायन्सेस, विनती ऑरगॅनिक्स, यूएसव्ही, श्री पुष्कर केमिकल्स, रत्नागिरी केमिकल्स आणि स्पॅक ऑर्गोकेमसारखे उद्योग आहेत. यातील अनेक उद्योगांची उत्पादने देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत जातात. स्पॅक ऑर्गोकेमची उत्पादने ४० हून अधिक देशांत पोहोचतात; मात्र, या उद्योगांना समर्पित मालवाहतूक मार्गिकेचा प्रभावी लाभ मिळण्यासाठी लोटेची स्थानिक रस्ते व रेल्वेजोडणी सक्षम करणे आवश्यक आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीपासून बंदरापर्यंतची अखंड वाहतूक व्यवस्था उभारण्याचे आव्हान कायम आहे.
---
कोट
लोटेची वाहतूक साखळी सक्षम झाली तर लोटेतील उद्योगांना मोठा फायदा होऊ शकतो; मात्र लोटेपर्यंत डीएफसीची थेट रेल्वेजोडणी नसल्याने जवळच्या रेल्वे मालवाहतूक केंद्राशी जोडणी, कंटेनर हाताळणी केंद्र, मालवाहू वाहनांसाठी वाहनतळ, चांगले जोडरस्ते आणि रासायनिक मालाच्या सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था उभारणे आवश्यक आहे.
-सुनील शिर्के, उद्योजक, लोटे

कोट
लोटे एमआयडीसीपासून मालवाहतूक केंद्रापर्यंतची पहिली आणि जेएनपीटीनंतरची दुसरी अशी व्यवस्था सक्षम करावी लागेल. ही साखळी मजबूत झाल्यास लोटेच्या औद्योगिक विस्ताराला वाहतुकीच्यादृष्टीने नवी ताकद मिळू शकते. लोटे एमआयडीसीची खरी गरज आता केवळ उत्पादन वाढवण्याची नसून, उत्पादन जेएनपीटीमार्गे जगाच्या बाजारपेठेत कमी खर्चात आणि कमी वेळेत पोहोचवण्याची आहे.
---बुवा सावंत, अध्यक्ष, ट्रक वाहतूक संघटना, लोटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT