कोकण

शाळांच्या सेफ्टी ऑडिटकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

CD

rat१६p१०.jpg -
26O64296
राजापूर ः अर्धवट स्थितीमध्ये असलेले शाळा दुरुस्तीचे काम.
rat१६p११.jpg-
26O64297
राजापूर ः लाकडी बांधकाम मोडकळीस येऊन धोकादायक झालेल्या शाळेची पाहणी करताना शाखा अभियंता संतोष भालेकर.
----
सेफ्टी ऑडिटकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
राजापुरात ११७ शाळांचे छप्पर धोकादायक; पाच कोटींची गरज
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः जीर्ण शाळांच्या इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच शिक्षण संचालनालयाने दिलेल्या ‘सेफ्टी ऑडिट’ (सुरक्षा मूल्यांकन) आदेशाला दोन महिने उलटूनही स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणात राजापूर तालुक्यातील ११७ शाळांच्या इमारतींचे छप्पर अत्यंत नादुरूस्त असल्याचे समोर आले आहे.
शिक्षण विभाग या ऑडिटसाठी कधी मुहूर्त शोधणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजस्थानमधील झालावाड येथील दुर्घटनेनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व शाळांचे सेफ्टी ऑडिट करून कृती अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाने दिले होते; मात्र, राजापूर तालुक्यात अद्याप या प्रक्रियेला सुरुवातच झालेली नाही. तालुक्यातील शाळांची चिंताजनक स्थिती आहे. तालुक्यातील ११७ शाळांच्या इमारतींचे छप्पर अत्यंत नादुरूस्त असल्याचे समोर आले आहे. यापैकी ७० शाळांच्या इमारती अतिधोकादायक असून, त्यांचे संपूर्ण छप्पर बदलणे गरजेचे आहे, तर उर्वरित ४७ शाळांची तत्काळ दुरुस्ती आवश्यक आहे. या सर्व शाळांची छप्पर दुरुस्ती आणि नव्या वर्गखोल्यांच्या उभारणीसाठी सुमारे ५ कोटी ९ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. बहुतांश शाळा ३० वर्षांपेक्षा जुन्या आहेत. नुकतीच कोंड्ये येथील शाळेत छप्परांची लाकडी रिप कोसळण्याची घटना घडली होती. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु यामुळे मोठा धोका अधोरेखित झाला आहे. शिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार शाळा, तालुका व व्यवस्थापननिहाय सुरक्षा अहवाल तयार करून तो विभागीय शिक्षण उपसंचालकांमार्फत सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक शिक्षण विभागाने कागदी घोडे नाचवणे थांबवून तातडीने ‘सेफ्टी ऑडिट’चे काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी पालकांमधून होत आहे.
---
याची होणार तपासणी
* शाळांमधील सुरक्षेची प्रत्यक्ष चाचपणी होणार
* अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत आहे का?
* विजेचे वायरिंग सुरक्षित आहे का?
* इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का?
* इमारतीचे आयुर्मान आणि संभाव्य धोके कोणते आहेत?
* शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का?
* आपत्कालीन परिस्थितीत शाळेची सज्जता आणि बाहेर पडण्याचे मार्ग
---
कोट १
‘राज्याच्या शिक्षण संचालनालयाकडून शाळांचे सेफ्टी ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या असून, लवकरच शाळांच्या सेफ्टी ऑडिटच्या कामाला सुरुवात होईल.’
- उत्तम भोसले, गटशिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Seva Sanklap Abhiyan : ५० लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जमीन नोंदणी, १७ सप्टेंबरला दीपोत्सवाचा शुभारंभ; महिनाभर चालणार ‘सेवा-संकल्प अभियान’

Gold Hallmarking Charges : दसरा-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी महागणार? BIS या निर्णयामुळे खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री

MPSC Exam : एक दोन गुणाने यश हुलकावणी देत होते; अखेर योगेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

Stray Dog Attacks : परळीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 वर जणांना चावा, शहरात भीती, 26 जणांवर उपचार सुरू

SCROLL FOR NEXT