rat१६p१२.jpg-
26O64298
रत्नागिरी : शुभंकर शिंदे यांच्या निवासस्थानी साकारलेला आर्यभट्टरूपी गणेश.
---
नाचणेत साकारला ज्ञानरूपी ‘आर्यभट्ट गणपती’
शुभंकर शिंदे ः हिंसा नको, शिक्षणाच्या हक्काबाबत जागरूकता
मकरंद पटवर्धन ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : देशातील पेपरफुटी, त्यानंतर दिल्लीत झालेले आंदोलन, हिंसा आणि राजकारण या सर्व मुद्द्यांना बाजूला सारत शिक्षण हे सर्वांत महत्त्वाचे आहे जे विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे, त्यासाठीचा प्रबोधनात्मक गणपती व सजावट नाचणे येथील शुभंकर शिंदे व मित्रांनी साकारली आहे. भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी शून्य, पाय व अन्य शोध लावले. त्यामुळे त्यांच्या रूपात गणपती साकारला. गणपतीच्या एका हातात पुस्तक आहे व दुसऱ्या हातात ज्ञानज्योत आहे. हिंसा हा मार्ग होऊ शकत नाही, विद्या हाच मार्ग होऊ शकतो. शिक्षणाचा हक्क आणि मुलांमध्ये त्याबद्दलची जागरूकता असा सजावटीचा विषय अतिशय कलात्मकरित्या साकारला आहे.
नाचणे येथील कोहिनूर एन्क्लेव्हमधील सदनिकेत शुभंकरने हा देखावा साकारलाय. गाडीतळ येथील कल्पक कलाकेंद्रातील सुधीर कांबळे, प्रवीण साबळे, सुरज भोसले, मयूर भुवड आणि प्रसन्न पानगळे व शुभंकरने मूर्ती फक्त बारा तासांत साकारली. एका हाताने गणपती पुस्तक देत असून, दुसऱ्या हातात पणती असून गणपती प्रकाश देत आहे. तर मागील पडद्यावर आर्यटभट्टाने शून्य, पाय आदींचा शोध, नीट पेपरफुटीमुळे २१ जणांनी आपला प्राण गमावला, त्यांचे प्रत्येकी एकेक हात यावर आधारित ही सजावट आहे.
शुभंकरने सांगितले की, दिल्लीत आंदोलन झालं, हिंसा झाली आणि मूळ मुद्दा शिक्षण, मुलं आणि त्यांचा हक्क हा बाजूला पडला. त्या मुद्द्याला परत समाजात आणण्याचा एक प्रयत्न म्हणून यावर्षीचा गणपती सजावट केली. आर्यभट्टांनी शून्य, पायचा शोध, खगोलशास्त्र, ट्रिग्नोमेट्री, पृथ्वीचं गुरूत्वाकर्षण, डेसिमल पॉईंट्सचा शोध लावला. त्यानंतर विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती झाली आहे. त्यामुळे आर्यभट्टांच्या रूपात गणपती साकारलाय व गणेशाच्या हातामध्ये एक पुस्तक धरलंय, दुसऱ्या हातात ज्ञानज्योत आहे. हे पुस्तक, विद्या या हातांना देतोय जे हे २१ हात वेगवेगळ्या मुद्रेमध्ये घेतलेले आहेत. विद्येसाठीचा लढा चालू ठेवा, हिंसा हा मार्ग होऊ शकत नाही, विद्या हाच मार्ग होऊ शकतो, असे दाखवले आहे.
---
२०१३ पासून विविध देखावे
शुभंकरने यापूर्वी नटराज नृत्य महाल आणि भारतीय नृत्य विविधता, निसर्गाचा अटळ नियम : जीवन-मृत्यू एकसाथ अटळ प्रवास, वृक्षतोड : निसर्गाचं बाजारीकरण, लुप्त होणारे जीव आणि काँक्रिटचे जंगल, मानवता हाच धर्म, गोकर्ण महाबळेश्वर संकल्पनेतून गुराखीरूपी गणपती, भारतीय पारंपरिक पशुपालन व गोमाता संरक्षण या विषयांवर सजावट, देखावे साकारले आहेत.
------
कोट १
दरवर्षी नवनवीन संकल्पना असते. समाजात घडलेल्या घटनांबद्दलचा उल्लेख आणि त्यातून एक विचार आणि संदेश देण्याचा प्रयत्न करतो. मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे, शाडूचा वापर केला आहे.
- शुभंकर शिंदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.