हेडलाइटचा वाद; दोघांना मारहाण
खवटी येथील घटना; सातजणांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १७ ः मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी परिसरात गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याच्या कारणावरून दोन तरुणांना बेदम मारहाण झाली. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात सातजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय गौतम धोत्रे (३२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अमोल दळवी (रा. पाखरवाडी, खवटी) याच्यासह सात संशयितांचा यामध्ये समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, ही घटना १४ सप्टेंबरला रात्री घडली. धोत्रे हे मित्र योगेश विट्ले यांच्यासह खवटी येथील चायनीज सेंटरसमोर बसले होते. त्या वेळी अमोल दळवी मोटारीतून जात असताना वाहनाचा हेडलाईट धोत्रे यांच्या डोळ्यावर पडला. याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून दळवीने सहा-सात साथीदारांना बोलावून वाद घातला. त्यानंतर संशयितांनी धोत्रे यांना खाली पाडले. तसेच त्यांना व विटले यांना हॉटेलच्या प्रवेशद्वारापासून आतपर्यंत ओढत नेऊन हाताने व प्लास्टिकच्या खुर्च्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दोघे जखमी झाले. या प्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, इतर संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.