कोकण

ग्रामस्वच्छतेवरच गावाचे आणि मुलांचे भविष्य अवलंबून

CD

rat18p1.jpg-
64747
रत्नागिरी ः मिरजोळे ग्रामपंचायतीत वृक्षारोपण करताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल.

ग्रामस्वच्छतेवरच गावाचे भविष्य अवलंबून
मनुज जिंदल ; मिरजोळे ग्रामपंचायतीत वृक्षारोपण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ः गावाचा विकास केवळ सुंदर आणि मोठ्या इमारतींनी होत नसून, गावातील लोकांचे आरोग्य आणि मुलांचे उज्ज्वल भविष्य हे संपूर्णपणे स्वच्छतेवर अवलंबून असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत मिरजोळे समूह ग्रामपंचायतीमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, सरपंच रत्नदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा गावडे, पंचायत समिती सदस्य वैभव पाटील, उपसरपंच राहुल पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर आदी उपस्थित होते.
सेवाकेंद्रातून नागरिकांना मिळणारे दाखले, मुलांच्या शाळा प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांचे वितरण तसेच नोंदवह्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने पाहणी केली. कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करतानाच त्यांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावर विशेष भर दिला. उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल म्हणाले, गावांमध्ये निर्माण होणारा कचरा, प्लास्टिक, कीटकनाशके आणि अस्वच्छता थेट आपल्या अन्नात आणि पाण्यात मिसळत असतात. आज गावागावांत कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असून, त्याचे मुख्य कारण अस्वच्छता आणि प्रदूषण आहे. निधी आणि संसाधनांची मर्यादा असली तरी उपलब्ध साधनांमध्ये योग्य नियोजन करून नागरिकांना कचरा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

चौकट
कचरा विलगीकरण प्रभावीपणे करा
एमआयडीसी क्षेत्र किंवा वाढते नागरीकरण आहे, तेथे कचऱ्याची आणि सांडपाण्याची समस्या अधिक गंभीर बनते. यासाठी घंटागाडीचे योग्य व्यवस्थापन आणि कचरा विलगीकरण प्रभावीपणे राबवले पाहिजे. गावातील आरोग्याचा प्रश्न हा स्वच्छतेशी जोडलेला असल्याने पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनी यामध्ये पुढाकार घेऊन नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जिंदल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT